अफगाणिस्तानमध्ये महिलांना त्यांचे अधिकार मिळणे मुश्किल : शैलेंद्र देवळाणकर

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच बरोबर महिलांच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    मुंबई : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच बरोबर महिलांच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 1996 ते 2001 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार होते. त्यावेळी महिलांच्यावर अत्याचार करण्यात आले होते. तसेच त्यांना त्यांच्या हक्कापासून, अधिकारापासून, मानवी हक्कापासून वंचित ठेवण्यात आले होते.

    दरम्यान त्याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. महिलांना त्यांचे अधिकार, हक्क, शिक्षण, योजनांचे फायदे, रोजगार इत्यादी महिलांना मिळणे मुश्किल होईल. असं आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी म्हटले आहे.