udhav thackrey

दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे, म्हणून काम केलं जातंय. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असं म्हटलं जातंय. मात्र, तसं होणार नाही. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

    मुंबई:  राजीनामा घेणं, गुन्हा दाखल करुन मोकळे होणं म्हणजे न्याय देणं नव्हे. या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणाने व्हावा ही भूमिका आमची आहे.  भाजपकडून राज्यात गलिच्छ राजकारण सुरु असल्याचा पलटवार करत  संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली  प्रतिक्रिया दिली. आहे . जे तपासातून समोर येईल त्यानुसार कारवाई होईल, असं आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

    ज्या वेळेस घटना घडली त्याच वेळेस तपासाच्या सुचना दिल्यात. कालबाह्या तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश, कुणालाही पाठिशी घालणार नाही. नुसती आदळआपट करण्याचा प्रघात योग्य नाही. तुमच्या काळातही हिच तपास यंत्रणा असल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना करून दिली.

    न्यायाने वागणं ही आमची जबाबदारी आहे. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे, म्हणून काम केलं जातंय. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असं म्हटलं जातंय. मात्र, तसं होणार नाही. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. याशिवाय संजय राठोडांच्या राजीनाम्याचे पत्रही अनिल परब यांनी यावेळी वाचून दाखवले. इतकेच नव्हेतर पूजा चव्हाणांच्या आई वडील व बहीण यांनी आपली भेट घेऊन,दिलेले पत्रही वाचून दाखवण्यात आले.