अभिव्यक्तीचे ढोल पिटवताना अभिनेता मयुरेश कोटकर वर गुन्हा दाखल करून दबाव आणणे निंदनीय; प्रविण दरेकरांची टिका

एकाबाजुला व्यक्ति स्वातंत्र्याचे, अभिव्यक्तीचे ढोल पिटवत असताना अभिनेता मयुरेश कोटकर नावाच्या गृहस्थावर अशाप्रकारे गुन्हा दाखल करत दबाव आणत अटक करणे निंदनीय आहे. दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे, अशा प्रकारच्या आंदोलनाच्या प्रक्रियेत तो होता असे दरेकर म्हणाले.  

    मुंबई : विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी अभिनेता मयुरेश कोटकर वरील कारवाई वरून राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे. माध्यमांना दिलेल्या चित्रफितीमध्ये ते म्हणाले की, एकाबाजुला व्यक्ति स्वातंत्र्याचे, अभिव्यक्तीचे ढोल पिटवत असताना अभिनेता मयुरेश कोटकर नावाच्या गृहस्थावर अशाप्रकारे गुन्हा दाखल करत दबाव आणत अटक करणे निंदनीय आहे. दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे, अशा प्रकारच्या आंदोलनाच्या प्रक्रियेत तो होता असे दरेकर म्हणाले.

    महाविकास आघाडीची दडपशाही सुरू आहे

    त्यांनी सांगितले की, फेसबूकवर सर्व लोक आपल्या भावना व्यक्त करत असतात, परंतु केवळ आपल्याला बोलले गेले त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अटक करा हे निंदनीय आहे. दरेकरांनी सवाल केला की, अलीकडच्या काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये हे सुरू आहे.  ठाण्यामध्ये कोरमुसेचा त्याचप्रकारे प्रसंग घडला.  तशाचप्रकारे मारहाण, त्याचप्रकारे जबरदस्ती झाली होती.

    तसेचं दोन दिवसांपूर्वी आमदार दिलीप लांडे यांच्या मार्फत कंत्रातदारावर कचरा फेकण्यात आला होता, ताक्षचप्रकरची कृती आहे.  रोज अशाप्रकारच्या घटना घडत आहे,  लोकशाहीला हानिकारक अशा घटना आहे, यांचा मी निषेध करतो असे सांगत दरेकर म्हणाले की,  अभिनेता मयुरेश कोटकर यांना अटक करणे निंदनीय आहे असे दरेकर म्हणाले.