”मुख्यमंत्र्यांना दिलीप कुमार यांच्या घरी जायाला वेळ आहे, पण स्वप्निल लोणकरच्या आईला भेटायला नाही” नितीश राणेची टीका

महाराष्ट्र सरकारच्या अपयशामुळे मृत्यू झालेल्या स्वप्निल लोणकरच्या आईलाही ते भेटायला गेले असते अशी अपेक्षा. त्यांना तिथे जाण्यासाठी वेळ नाही, मात्र येथे जाण्यासाठी पूर्ण वेळ होता. दुख:द पण सत्य”,आहे

    मुंबई: ‘मुख्यमंत्र्यांना दिलीप कुमार यांच्या घरी जायाला वेळ आहे, पण स्वप्निल लोणकरच्या आईला भेटायला नाही’, असे म्हणत नितीश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं बुधवारी पहाटे मुंबई येथे निधन झालं. दरम्यान दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह राजकीय नेतेही त्यांच्या घरी पोहोचले. यावरुन नितीश राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
    उद्धव ठाकरें यांना स्वप्नील लोणकरच्या घरी जाण्यासाठी वेळ नाही, मात्र तिथे जाण्यासाठी वेळ होता असं सांगत नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांचं सांत्वन करतानाचा फोटोही शेअरकरत हे ट्विट केला आहे.

    यामध्ये “महाराष्ट्र सरकारच्या अपयशामुळे मृत्यू झालेल्या स्वप्निल लोणकरच्या आईलाही ते भेटायला गेले असते अशी अपेक्षा. त्यांना तिथे जाण्यासाठी वेळ नाही, मात्र येथे जाण्यासाठी पूर्ण वेळ होता. दुख:द पण सत्य”,आहे असे म्हटले आहे.

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याने सध्या राज्यात खळबळ माजली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमधून नैराश्यातून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.