कंगनाच्या विधानाला भाजपसोबत जोडणं चुकीचं : आशिष शेलार

आज ज्या पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी  केलं त्याच्यावर आमची स्पष्ट भूमिका मांडत आहोत. कंगणा रनौत यांनी मुंबई, मुंबईकर आणि महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मुंबई, मुंबईकर आणि महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवणारे कुठलेही वक्तव्य जर कंगण रनौतने केले असेल किंवा केलेलं आहे. त्याच्याशी भारतीय जनता पक्षाला जोडणं हे अत्यंत दुर्दैवी आणि चुकीचे आहे. तसेच त्याच्याशी आम्ही असहमत आहोत. असे ॲड. आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

मुंबई : मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं वक्तव्य अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut)  केल्याने राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. तसेच या वक्तव्यावर संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाला जोडणं हे अत्यंत दुर्दैवी आणि चुकीचे आहे. तसेच त्याच्याशी आम्ही असहमत आहोत. असं भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटलं आहे.

ज्या पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं त्याच्यावर आमची स्पष्ट भूमिका

सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणातून जेवढी वळणं या चौकशीला वेगवेगळ्या दिशेने नेण्यात येईल किंवा प्रयत्न काही राजकीय मंडळी हे वारंवार करीत आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देश बघत आहे. आज ज्या पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी  केलं त्याच्यावर आमची स्पष्ट भूमिका मांडत आहोत. कंगणा रनौत यांनी मुंबई, मुंबईकर आणि महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मुंबई, मुंबईकर आणि महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवणारे कुठलेही वक्तव्य जर कंगण रनौतने केले असेल किंवा केलेलं आहे. त्याच्याशी भारतीय जनता पक्षाला जोडणं हे अत्यंत दुर्दैवी आणि चुकीचे आहे. तसेच त्याच्याशी आम्ही असहमत आहोत. असे ॲड. आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

कंगणा रनौत यांच्या पाठीमागे राहून वार करण्याची गरज नाही

आशिष शेलार पुढे म्हणाले की, संजय राऊत यांना सुद्धा आमचं सांगणं आहे की, सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये चौकशीतल्या गोष्टींना विपर्यास किंवा दुसऱ्या दिशेने नेण्यासाठी कंगणा रनौत यांच्या पाठीमागे राहून वार करण्याची गरज नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी चालू असताना कुठल्याही अशा पद्धतीच्या वक्तव्यावर वातावरण तापवण्यापासून सगळ्यांनीच स्वत:ला वाचविले पाहिजे.