येत्या दोन दिवसांत राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय जाहीर होणार? उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला

येत्या दोन दिवसांत राज्यातील पदवी महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात(decided to start colleges in the state in next 2 days) येऊन तारीख ही जाहीर करण्यात येईल अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत(Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी मंगळवारी ट्विट करून दिली आहे.

    मुंबई : येत्या दोन दिवसांत राज्यातील पदवी महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात(decided to start colleges in the state in next 2 days) येऊन तारीख ही जाहीर करण्यात येईल अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत(Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी मंगळवारी ट्विट करून दिली आहे.

    महाविद्यालये सुरु करण्याचा प्रस्ताव सध्या मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविला असून त्यांच्याकडून तो पुढे मुख्यमंत्र्यांकडे पाठविला जाणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. त्यामुळे राज्यातील पदवी महाविद्यालये प्रत्यक्षात कधी सुरु होणार याची माहिती दिवाळीपूर्वीच विद्यार्थी, प्राचार्यांना मिळण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    राज्यातल्या शाळा सुरु होऊन आठवडा उलटला, शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी शहरी व ग्रामीण दोन्ही भागांत उपस्थिती ही लावू लागले आहेत मात्र विविध पदवी अभ्यासक्रमाचे मात्र अजूनही घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. राज्यातल्या पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांना अद्याप प्रत्यक्षात वर्ग सुरु करण्याची परवानगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मिळाली नसल्याने लसीकरण होऊनही विद्यार्थी घरूनच शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शासन व उच्च तंत्र शिक्षण विभागाने महाविद्यालये लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी विद्यार्थी पालकांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

    दरम्यान, राज्याच्या सर्व विद्यापीठांकडून स्थानिक पातळीवरील अहवाल मागवून मगच महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. मात्र राज्यातल्या काही जिल्ह्यातील महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर राज्याच्या इतर जिल्ह्यांतील शैक्षणिक संस्थांबद्दलही संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे येत्या २ दिवसांत यासंदर्भातील निर्णय जाहीर करू अशी माहिती सामंत यांनी ट्विट करून दिली.

    शाळांच्या आधी महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने,प्रात्यक्षिके ही शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाची असतात. यापूर्वीच विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले आहे, यामध्ये आता सरकारने आणखी वेळकाढूपणा करू नये अशी अपेक्षा शिक्षणतज्ज्ञ व पालकही करीत आहेत.