महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने आजपासून राज्यात वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याचे हवामान अभ्यासक के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात पाऊस पडणार आहे. तसेच, राज्यातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकणच्या भागात पाऊस पडणार आहे. मुंबईसह या भागात हवामान खात्यातर्फे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    मुंबई : राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून पाऊसाने दडी मारली आहे. ग्रामीण भागात पावसाअभावी पिकं करपताना दिसत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या सर्वच भागात मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने आजपासून राज्यात वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याचे हवामान अभ्यासक के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

    महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात पाऊस पडणार आहे. तसेच, राज्यातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकणच्या भागात पाऊस पडणार आहे. मुंबईसह या भागात हवामान खात्यातर्फे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेचं राज्यात आजपासून सोलापूर, जालना, बीड, औरंगाबाद, हिंगोली, परभणी या भागात आजपासून पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यातील अनेक भागात गेल्या काही आठवड्यांपासून दमदार पावसाची प्रतिक्षा होती. पावसाअभावी मराठवाड्यातील अनेक धरणं भरलेली नाहीत. राज्यातील प्रमुख उजनी, जायकवाडी, विष्णूपुरी, गंगापूरसह अनेक मध्यम व लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरू शकले नाहीत.

    दरम्यान, येत्या काही दिवसात राज्यात सर्वदूर पाऊस बरसणार आहे. राज्यात 31 ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 1 सप्टेंबर रोजी पालघर या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आणि उर्वरित कोकणातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.