मुंबई : आजपासून चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु झाले आहे.. या पार्श्वभूमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनामुळे जग नक्की बदलणार आहे, मात्र यानंतरही आपण भरारी घेऊ

 मुंबई : आजपासून चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु झाले आहे.. या पार्श्वभूमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनामुळे जग नक्की बदलणार आहे, मात्र यानंतरही आपण भरारी घेऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. आतापर्यंत राज्यात ५० हजार उद्योग सुरु झाले आहेत, तर ४ ते ५  लाख कामगार कामावर रुजू झाले आहेत. ग्रीन झोन आपल्याला सुरक्षित ठेवायचा आहे. तसेच रेड झोनचं रुपांतरही ग्रीन झोन करायचा आहे. मात्र रेड झोनमधील निर्बंध शिथिल करणे योग्य होणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

नव्या उद्योजकांनी महाराष्ट्रात या, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं. प्रदूषण न करणाऱ्यांना विनाअट परवानगी देणार असल्याचा शब्द यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला. नव्या उद्योगांसाठी ४०  हजार एकर जमीन राखीव ठेवली आहे. ग्रीन झोनमधील तरुणांनी आता आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. कामासाठी त्यांनी बाहेर पडणे गरजेचं आहे, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.