ठरलं! राष्ट्रवादी यापुढे केंद्रसरकारच्या निर्णयाविरोधात घेणार आक्रमक पवित्रा ; शरदा पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय

ओबीसी समाजाला शैक्षणिक, राजकीय आणि नोकरीतील आरक्षण मिळाले पाहिजे, त्याचवेळी मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. असे शरद पवार यांनी बैठकीत सांगितल्याचे नवाब मलिक म्हणाले. महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यासाठी आपण आदर पूनावाला यांचे वडील सायरस पूनावाला यांच्याशी थेट बोलून, लसीकरणात निर्माण झालेला तिढा दूर करण्याचा प्रयत्न करू, असे शरद पवार यांनी बैठकीत सांगितल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

    मुंबई :आजारपणातून नुकतेच बरे झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा (अध्यक्ष) शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या मंत्र्यांनी पहिली बैठक घेतली. भाजपाच्या पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर ज्या पद्धतीने भाजपने पावले उचलली आहेत, त्यातून लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारच्या अस्तित्वावर घाव घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बँकिंग कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली राज्यातील जिल्हा व नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व नष्ट करण्याचा हेतू केंद्र सरकारचा आहे. त्याला उत्तर म्हणून राज्यात स्वतंत्र कायदा करता येतो का? केंद्र सरकार जे बदल करू इच्छित आहे, त्याला न्यायालयात आव्हान देण्यासाठी कोणते मुद्दे मांडले गेले पाहिजे. यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे.

    केंद्रसरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका
    केंद्राने घेतलेल्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी आता आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना एकत्रित घेऊन टास्क फोर्सची स्थापना करून राज्य सरकार कसा कायदा करू शकतो, यावर विचार करण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

    मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे