भाजपला ‘जन आशीर्वाद’ महागात पडला; कल्याण डोंबिवलीत तब्बल ‘इतक्या’ जाणांवर गुन्हे दाखल

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. दरम्यान अशातच आता जन आशीर्वाद आयोजन प्रकरणी कल्याण डोंबिवलीत एकूण चार गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. कल्याणच्या खडकपाडा, महात्मा फुले, कोळसेवाडी आणि डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याला नव्याने ४ मंत्रीपदे देण्यात आली असून त्यातील एक कॅबिनेट तर उर्वरित तीन हे केंद्रीय राज्यमंत्रिपदे आहेत. ही मंत्रीपदे देण्यात आल्यानंतर आता राज्यात वेगवेगळ्या भागात भाजपने जन आशिर्वाद यात्रा सुरु केली आहे. मात्र भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.

    दरम्यान अशातच आता जन आशीर्वाद आयोजन प्रकरणी कल्याण डोंबिवलीत एकूण चार गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. कल्याणच्या खडकपाडा, महात्मा फुले, कोळसेवाडी आणि डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्ह्यात सोमवारी निघालेल्या जन आशीर्वाद यात्रेस मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते. यामुळे आता आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    जनआशीर्वीद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण

    दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या यात्रेवरून भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘जनआशीर्वीद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. ज्याप्रकारे या गर्दीचे नियंत्रण आहे. लोकांना एकत्र करताय हे तिसऱ्या लाटेचे आमंत्रण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतरही तुम्ही हे करताय, म्हणजे मुद्दामहूनच. पण, किमान संयम पाळा’ असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.