ठाकरे सरकारला विकासाची काविळ : आशिष शेलार यांचे टीकास्त्र

आशिष शेलारांनी माध्यमांशी बोलताना सरकारला मेट्रोच्या बाबतीत गंभीर्यच नाही असा आरोप केला. ज्या अर्थी बुलेट ट्रेनच्या जागी मेट्रो कारशेड तयार करण्याचा प्लॅन आहे तिथेच ठाकरे सरकार मेट्रो बाबतीत गंभीर नसल्याचे समोर येत आहे.

मुंबई: भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेना महाराष्ट्र द्रोह का करत आहे? असा सवाल करत ठाकरे सरकारला त्यांनी विकासकामाची काविळ झाली आहे का असा सवाल केला आहे. आशिष शेलारांनी माध्यमांशी बोलताना सरकारला मेट्रोच्या बाबतीत गंभीर्यच नाही असा आरोप केला. ज्या अर्थी बुलेट ट्रेनच्या जागी मेट्रो कारशेड तयार करण्याचा प्लॅन आहे तिथेच ठाकरे सरकार मेट्रो बाबतीत गंभीर नसल्याचे समोर येत आहे. त्यांनी व्टिट करत म्हटले आहे की, पृथ्वीराज चव्हाणांच्या निक्रियतेमुळे मुंबईत आर्थिक केंद्र झाले नाही. फडणवीस सरकारने आर्थिक केंद्र बीकेसीत करण्याचे प्रस्तावीत केले मात्र ठाकरे सरकारने त्यामध्ये खोडा आणण्याचा प्रयत्न करत आहे. विकासाचे काम लडकवणे हीच ठाकरे सरकारची शैली आहे असे म्हणत शेलार यांनी ठाकरे सरकारला सावल केला की. बेस्टचे खाजगीकरण करून मुंबईकरांना बैलगाडी देणार का? मुंबईकरांच्या खिशाला आधिक भार देण्याचे काम ठाकरे सरकारचे असून ठाकरे सरकारला विकासाचे कावीळ झाली आहे अशीही शेलकी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.