जया बच्चन यांचे विधान अगदी योग्य, आरोप करणाऱ्यांची डोप टेस्ट करण्याची राऊतांची मागणी

जया बच्चन यांनी केलेले वक्तव्य अगदी योग्य आहे. कंगना राणौतने ते वक्तव्य केले त्यावर बच्चन कुटुंबीय वक्तव्य देऊ शकते. कंगना राणौत आदित्य ठाकरेंवर जे काही आरोप करत आहे. त्याचे पुरावे तिने गृहमंत्रालय, गृहसचिव आणि तपास यंत्रणांना दिले पाहिजेत.

मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाचे (Bollywood Drugs case) पडसाद आता दिल्लीमध्ये संसदेच्या पावासाळी अधिवेशनात उमटत आहेत. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणावरुन भाजपा खासदार रवि किशन (Ravi kishan) यांनी बॉलिवूडवर आरोप केले आहेत. तर त्यांच्या आरोपावर खासदार जया बच्चन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणी वक्तव्य करताना जया बच्चन (Jaya Bachchan)  यांना पाठिंबा दिला आहे तर बॉलिवूडवर आरोप करणाऱ्यांची प्रथम डोप टेस्ट (dope testing ) करण्याची मागणी (demand ) केली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, जया बच्चन यांनी केलेले वक्तव्य अगदी योग्य आहे. कंगना राणौतने ते वक्तव्य केले त्यावर बच्चन कुटुंबीय वक्तव्य देऊ शकते. कंगना राणौत आदित्य ठाकरेंवर जे काही आरोप करत आहे. त्याचे पुरावे तिने गृहमंत्रालय, गृहसचिव आणि तपास यंत्रणांना दिले पाहिजेत. तसेच या ड्रग्ज प्रकरणी जे लोक प्रश्न उपस्थित करत आहेत.त्यांचीच पहिली डोप टेस्ट झाली पाहिजे.

देशात जर आंतरराष्ट्रीय मार्गांनी ड्रग्ज येत असतील तर ती केंद्र आणि केंद्रीय तपास यंत्रणांची जबाबदारी आहे. कुठल्याही क्षेत्रात काही वाईट लोक आहेत. याचा अर्थ ते संपूर्ण क्षेत्रच वाईट नसते. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.