त्या २ मंत्र्यांचे राजीनामे घेणार का? जयंत पाटलांनी दिलं ‘हे’ उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील(jayant patil) यांनी पत्रकार परिषद(press conference) घेऊन विविध मुद्द्यांवर आज भाष्य केले आहे.  धनंजय मुंडे यांच्यावर झालेला बलात्काराचा आरोप, नवाब मलिक यांच्या जावयावरील अटकेची कारवाई तसंच पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी पक्षातील प्रवेशाची चर्चा या सगळ्या गोष्टींविषयी ते बोलले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील(jayant patil) यांनी पत्रकार परिषद(press conference) घेऊन विविध मुद्द्यांवर आज भाष्य केले आहे.  धनंजय मुंडे यांच्यावर झालेला बलात्काराचा आरोप, नवाब मलिक यांच्या जावयावरील अटकेची कारवाई तसंच पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी पक्षातील प्रवेशाची चर्चा या सगळ्या गोष्टींविषयी ते बोलले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्दे स्पष्ट केले.

जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, “पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीचा आढावा  घेतला जाईल. आवश्यकता भासली तर मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करु. तथ्याच्या आधारे योग्य त्या भूमिका घेतल्या जातील.”

मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत जे चर्चिले जात आहे त्यामध्ये जावयाने केलेल्या घटनेला म्हणजे ती केली आहे की नाही हे चौकशीत कळेल परंतु सासर्‍यावर परिणाम होण्याची आवश्यकता नाही,असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

नवाब मलिक आणि मुंडे प्रकरणात दोघांकडून राजीनामा घेणार का ? असे विचारले असता दोन्ही विषयात राजीनाम्याची आवश्यकता नाही. तशी परिस्थिती नाही. त्या परिस्थितीचा योग्य तो आढावा योग्य त्या स्तरावर घेण्यात येईल. मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची आवश्यकता नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच पंकजा मुंडेंच्या पक्षप्रवेशाची सध्या तरी चर्चा नाही हेदेखील स्पष्ट केले.