जयंत पाटलांनी युवक कारकीर्दीतला फोटो शेअर करुन नव्या गृहमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा…

    मुंबई : अनिल देशमुख यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. याचं पार्श्वऊमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्यासोबतचा युवक कारकीर्दीतला फोटो शेअर करुन अनोख्य पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. दिलीप वळसे पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी जयंत पाटलांनी एक ट्विट केलं आहे.

    माझे जुने मित्र नामदार दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त… कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे”, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आता गृहमंत्री या नव्या जबाबदारीसाठीही जयंत पाटील यांनी ट्विट करुन मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.