केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?; जागतिक निद्रा दिनादिवशी जयंत पाटलांचा पीएम मोदींना टोला

केंद्रातील कुंभकर्ण सरकाला केव्हा जाग येणार? असं म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. 'वर्ल्ड स्लीप डे' असं टॅग करत जयंत पाटील यांनी शेतकरी आंदोलन, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारला कुंभकर्णाची उपमा देत पाटील यांनी टोला लगावला.

    राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जागतिक निद्रा दिनादिवशी पीएम मोदींवर निशाणा साधला आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकाला केव्हा जाग येणार? असं म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ‘वर्ल्ड स्लीप डे’ असं टॅग करत जयंत पाटील यांनी शेतकरी आंदोलन, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारला कुंभकर्णाची उपमा देत पाटील यांनी टोला लगावला.

    शेतकरी आंदोलनात जवळपास ३००च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत. दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे.