झुंजार पत्रकार आणि आचार्य अत्रे सहकारी ज्येष्ठ लेखिका-पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर-वर्मा यांचे निधन

आणीबाणीच्या काळात त्यानी सायंदैनिक पहाराच्या माध्यमातून निषेध करणाऱ्या सभा, संमेलनांचा वृत्तांत तसेच भूमिगत नेत्यांच्या सडतोड मुलाखती कोणतीही काटछाट न करता जशाच्या तशा प्रसिद्ध करून  त्यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले. याकाळात त्यांना अनेक नोटिसाना सामोरे जावे लागले. 

    मुंबई : आणिबाणीच्या काळातील झुंजार पत्रकार आणि आचार्य अत्रे यांच्या सहकारी ज्येष्ठ लेखिका-पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर-वर्मा यांचे आज पहाटे मुंबईतील कांदिवली येथे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पाठीमागे लोकप्रभा चे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रदिप वर्मा आणि कुटूंबीय आहेत. मराठी साहित्य पत्रकारिता क्षेत्रात त्यांची निर्भय आणि निर्भीड  महिला पत्रकार अशी ओळख होती. आक्रमक आणि ओघवती भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती.

    आणीबाणीच्या काळात त्यानी सायंदैनिक पहाराच्या माध्यमातून निषेध करणाऱ्या सभा, संमेलनांचा वृत्तांत तसेच भूमिगत नेत्यांच्या सडतोड मुलाखती कोणतीही काटछाट न करता जशाच्या तशा प्रसिद्ध करून  त्यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले. याकाळात त्यांना अनेक नोटिसाना सामोरे जावे लागले. पुष्पा त्रिलोकेकर यांनी पत्रकारीतेची सुरूवात आचार्य अत्रे यांच्या मराठामधून केली. मराठा बंद झाल्यावर त्यांनी सायंदैनिक ‘पहारा’ च्या संपादकपदाची जबाबदारी  स्वीकारली होती. अनेक दैनिक आणि साप्ताहिकांसाठी त्यानी लेखन केले आहे.