भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई इथे नोकरीची संधी, अर्ज कसा करायचा? : जाणून घ्या एका क्लिकवर

भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी आणि वैज्ञानिक अधिकारी-सी या पदांसाठी ही भरती असणार आहे.

  मुंबई : भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी आणि वैज्ञानिक अधिकारी-सी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  -या पदांसाठी भरती

  वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी

  वैज्ञानिक अधिकारी-सी

  पात्रता आणि अनुभव

  वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी
  ( हॉस्पिटल प्रशासनात पदव्युत्तर पदविका सह MBBS आणि किमान तीन वर्षांचा अनुभव)

  वैज्ञानिक अधिकारी-सी
  (B.V.Sc आणि AH आणि किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक)

  पात्रता आणि अनुभव

  किती मिळणार पगार?

  वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी – 67700/- रुपये प्रतिमहिना

  वैज्ञानिक अधिकारी-सी – 56100/- रुपये प्रतिमहिना

  अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2021

  या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahasarkar.co.in/barc-mumbai-recruitment/ या लिंकवर क्लिक करा.