कधीच School homework मिळू नये म्हणून चिमुकलीने केलंय असं काम; VIDEO पाहून म्हणाल आता तर हद्दच झाली

या मुलीच्या निरागस चेहऱ्यावर बिलकुल जाऊ नका बरं का. या चेहऱ्यामागे असा मस्तीखोर चेहरा दडला आहे, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. जे इतके वर्षे कुणालाच जमलं नाही ते या चिमुकलीने असं एका चुटकीत केलं आहे. तिने शिक्षकाने होमवर्क देऊ नये, यासाठी एक उपाय शोधला, तो अवलंबला आणि इतरांना हा परफेक्ट मार्ग सांगितला.

    मुंबई : स्कूल होमवर्क (School homework) म्हणजे लहान मुलांच्या डोक्याला एक मोठा तापच असतो. आपणसुद्धा शाळेत असताना आपल्याला स्कूल होमवर्क (Homework) नसता तर बरं झालं असतं असंच वाटायचं. सध्या कोरोना लॉकडाऊनमुळे (Corona lockdown) गेले काही महिने शाळा बंद (School closed) होत्या. त्यामुळे ऑनलाइन स्कूल (Online school) सुरू होते. अगदी शिकवण्यापासून ते परीक्षेपर्यंत सर्व काही ऑनलाइन. या ऑनलाइन शाळेतही होमवर्कपासून काही सुटका झाली नाही. पण एका चिमुकलीने मात्र सॉलिड जुगाड केला आणि स्कूल होमवर्कपासून आपली सुटका करून घेतली आहे.

    ऑनलाइन स्कूलमुळे मुलांच्या हातात त्यांचा आवडता मोबाइल, लॅपटॉप किती तरी वेळेसाठी मिळू लागला. पण इतका वेळ शाळा आणि त्यानंतर होमवर्क त्यामुळे मुलांवरील भारही वाढला. किमान या होमवर्कपासून तरी आपली सुटका व्हावी यासाठी चिमुकलीने प्रयत्न केला. तिने असं काही केलं ज्यामुळे तिला आता शाळेचा होमवर्क कधीच येत नाही.

    होमवर्क न मिळण्यावर सोल्युशन देणाऱ्या या निरागस चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

    या मुलीच्या निरागस चेहऱ्यावर बिलकुल जाऊ नका बरं का. या चेहऱ्यामागे असा मस्तीखोर चेहरा दडला आहे, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. जे इतके वर्षे कुणालाच जमलं नाही ते या चिमुकलीने असं एका चुटकीत केलं आहे. तिने शिक्षकाने होमवर्क देऊ नये, यासाठी एक उपाय शोधला, तो अवलंबला आणि इतरांना हा परफेक्ट मार्ग सांगितला.

    होमवर्क न मिळण्यासाठी नेमका काय जुगाड केला हे स्वतः या चिमुकलीने व्हिडिओतून सांगितलं आहे. शनाया कंबोज असं या मुलीचं नाव आहे. व्हिडिओत तुम्ही ऐकू शकता. कुणी तरी तिला विचारतं शनाया तुला शाळेतून किती होमवर्क मिळतो. ती अगदी निरागसपणे या प्रश्नाचं उत्तर देत. आपल्याला होमवर्क मिळतच नाही कारण आपण टिचरला ब्लॉक केलं आहे.

    काय तुम्ही शॉक झालात ना? तुमच्याप्रमाणेच बहुतेक जणांना चिमुकलीचा हा अजब जुगाड पाहून धक्का बसला आहे. पण तिने सर्वांचं मनही जिंकून घेतलं आहे. या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट केल्या जात आहे.

    jugaad of little girl for getting school homework funny video viral on social media