दहावीचा जुलै तर निकाल बारावीचा ऑगस्टमध्ये; असा लावणार रिझल्ट

दहावीची परीक्षा रद्द झाल्याने सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना नववीच्या गुणांवरून 50 टक्‍के तर तोंडी परीक्षेतून 20 टक्‍के आणि पूर्व परीक्षा, लेखी परीक्षेतील गुणांवरून 30 टक्‍के गुण देण्याचे धोरण ठरले आहे.

    मुंबई :  दहावीची परीक्षा रद्द झाल्याने सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना नववीच्या गुणांवरून 50 टक्‍के तर तोंडी परीक्षेतून 20 टक्‍के आणि पूर्व परीक्षा, लेखी परीक्षेतील गुणांवरून 30 टक्‍के गुण देण्याचे धोरण ठरले आहे.

    आता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करताना त्यांच्यासाठी दहावी की अकरावीच्या गुणांचा आधार घ्यावा, या पेचात शालेय शिक्षण विभाग सापडले असतानाच दहावीचा निकाल जुलैपर्यंत जाहीर होईल, असे पुणे बोर्डचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले.

    दरम्यान, बारावाची निकालही ऑगस्टमध्ये जाहीर केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शासनाने दिलेल्या आदेशानुसार व्हावे. शाळांनी त्यात काही फेरफार केल्यास निश्‍चितपणे कारवाई होईल असेही ते म्हणाले.