महालक्ष्मी रेसकोर्सवर पुन्हा ४५५ खाटांचे उभारणार जम्बो कोविड सेंटर; पालिका करणार ४५ कोटी रुपयांचा खर्च

महालक्ष्मी रेसकोर्सच्या पार्किंग क्षेत्रात ४५५ खाटांचा कोरोना केंद्र उभारण्यात येणार आहे. महालक्ष्मी जम्बो कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजन पुरवठा, अग्नीसूचक यंत्रणा अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

  मुंबई (Mumbai) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर (third wave of corona) महालक्ष्मी (Mahalakshmi) येथे पुन्हा जम्बो कोविड सेंटर (the Jumbo Covid Center) सुरु करण्याचा निर्णय मुंबई पालिका प्रशासनाने (Mumbai Municipal Corporation administration) घेतला आहे.

  या कोविड सेंटरमध्ये (The Covid Center) २०५ आयसीयू बेड्स (ICU beds) व गंभीर असलेल्या कोरोना बाधित रुग्णांवर (corona patients) उपचार करण्यासाठी २५० असे ४५० बेड्स तैनात ठेवले जाणार आहेत. यासाठी पालिकेकडून ४४ कोटी ८३ लाख ३८ हजार रुपये खर्च केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

  मुंबईत गेल्या वर्षी कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच कोरोना रुग्णांची संख्या वाढली. इमारतींसह झोपडपट्ट्या, चाळी आदी ठिकाणी कोरोनाने कहर केला. वरळी, जिजामाता नगर, प्रभादेवी, आदर्श नगर, धारावी हे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. पालिकेच्या प्रभावी उपाययोजना व नियमांच्या कडक अंमलबजावणीमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले.

  त्यानंतर यावर्षीच्या फेब्रुवारीच्या मध्यावर कोरोनाची दुस-या लाटेला मुंबईकरांना सामोरे जावे लागले. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले. सर्वेक्षण, वाढवण्यात आलेल्य़ा चाचण्या, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा युद्धपातळीवर शोध, क्वारंटाईन, प्रतिबंधित क्षेत्राची कडक अंमलबजावणी, योग्य उपचार पद्धती व पालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे दुस-या लाटेवरही नियंत्रण आले आहे.

  सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा आरोग्य तंज्ञांनी दिला आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेत कोरोना बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे यासाठी महालक्ष्मी रेसकोर्सच्या पार्किंग क्षेत्रात ४५५ खाटांचा कोरोना केंद्र उभारण्यात येणार आहे. महालक्ष्मी जम्बो कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजन पुरवठा, अग्नीसूचक यंत्रणा अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच या सगळ्या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून सल्लागाराला १३ लाख रुपये मोजण्यात येणार आहेत.

  दरम्यान, महालक्ष्मी रेसकोर्सवरील जंम्बो कोविड सेंटरमुळे नायर, केईएम व सायन रुग्णालयाचा ताण कमी होणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.