कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून वाढत चालला आहे. सध्या मुंबईत कार्यरत असलेली कोविड सेंटर ही रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. वाढती रुग्ण संख्या पाहता राज्य आरोग्य विभागाने मुंबईत

 मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून वाढत चालला आहे. सध्या मुंबईत कार्यरत असलेली कोविड सेंटर ही रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. वाढती रुग्ण संख्या पाहता राज्य आरोग्य विभागाने मुंबईत जम्बो सुविधा देण्याचा निर्णय घेतला असून या सुविधेचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही दिवसांत या सुविधा मुंबईकरासाठी खुला होणार आहेत.

१. बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत उभारले देशातील पहिले ओपन हॉस्पिटल ( १००० बेड्सची जम्बो सुविधा ). याचठिकाणी २०० बेड्सची आयसीयू सुविधा

२. महालक्ष्मी येथे कोरोना केअर सेंटरचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु.६०० बेड्सची सुविधा यात १२५ बेडचे आयसीयू वॉर्ड असतील. कोविड १९च्या मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे ठेवले जाईल. 

३. नेसको गोरेगाव येथे ५३५ बेड्सची सुविधा असलेली जम्बो सुविधा कोरोना रुग्णांसाठी रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे ७००० पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेली डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल पुढील २ आठवड्यात  ३१ मे पर्यंत एसएससीआय वरळी,महालक्ष्मी, बांद्रा, व नेसको, गोरेगाव अशा मिळून २४७५ खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेत प्रत्येक वॉर्डमध्ये किमान १०० खाटा आणि २० आयसीयू खाटा असलेल्या रुग्णालयांची सुविधा ताब्यात घेतली. स्वत:च्या विलगीकरणाची सोय नसलेल्या कोविड रुग्णांसाठी ३० हजार खाटा क्षमतेच्या कोव्हीड केअर सेंटरची व्यवस्था मुंबईतील खाटांचे नियोजन आता संगणकाच्या माध्यमातून होणार त्यामुळे कोणत्या ठिकाणी खाटा उपलब्ध आहेत ते लगेच कळनार आहे. खाटांचा डाटा रिअल टाईम डॅशबोर्डमध्ये. प्रत्येक बेडला युनिक आयडी. डिस्चार्ज धोरणाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.रुग्णालयांची स्वच्छता, जेवण व इतर अनुषंगिक बाबींतून डीन यांची जबाबदारी कमी करण्यात आली आहे. आरोग्य उपचारांवर अधिक लक्ष देता येणे शक्य होणार आहे.

रुग्णवाहिका १०० वरून ४५० वर. या सेवेसाठी देखील मोबाईल अॅप असणार आहे. केइएम,नायर, सायन, जेजे, सेंट जॉर्ज आणि बीएमसी पेरिफेरल रुग्णालये यांची जबाबदारी ५ आयएएस अधिकाऱ्यांकडे असणार आहे. प्रत्येक रुग्णालयात वॉर रूम . सीसीटीव्ही सवय करण्यात आली आहे.मनपातर्फे दररोज ७ लाख  अन्नाची पाकिटे वाटप होत आहे.मुंबईत ३६० फिव्हर क्लिनिक १९१६ हेल्पलाईनवर ६५ हजार कॉल्स आत्तापर्यंत आले असून नागरिकांच्या शंकेचे निरसन करण्यात आले आहे.