कांदिवली बोगस लसीकरण प्रकरण; चार हजार मुंबईकरांना फटका

चारकोप शिवम हॅास्पिटलमध्ये बोगस लसीकरणाचे गैरप्रकार सुरू होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारत शिवम हॅास्पिटल बंद कले. ५ मार्च ते २८ एप्रिलदरम्यान शिवम हॅास्पिटल खासगी लसीकरण केंद्र होते. त्यावेळी १६ हजारांपेक्षा जास्त लशींच्या मात्रा देण्याचा कारभार या हॅास्पिटलमध्ये सुरू होता. तसेच १ लाख अधिक लशी थेट उत्पादकांकडून मिळवण्याचा हॅास्पिटल प्रशासनाचा उद्देश होता, अशी माहिती शोधपथकाने दिली आहे. मालाड मेडिकल संघटनेचा माजी सदस्य महेंद्र सिंग याच्या मदतीने लसीकरण केंद्रात नागरिकांची नोंदणी केली जात होती. हॅास्पिटल प्रशासनाला पुरेसा निधी न मिळाल्याने १ लाख लशींचे डोस विकत घेण्यात प्रशासनाला अडचण निर्माण झाली.

    मुंबई : कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत झालेल्या बोगस लसीकरण प्रकरणानंतर मुंबईतील तब्बल ४ हजार जणांचे बोगस लसीकरण झाल्याचे उघड झाले असून यांना लस म्हणून चक्क पाणी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले अाहे. याप्रकरणी पोलिसांनी बोगस लसीकरण रॅकेटचा पर्दाफाश करुन आरोपींना अटक केली आहे. या रॅकेटमध्ये हॅास्पिटलचे मालक, डॅाक्टर, वैद्यकीय संघटनेचा माजी सदस्य, हॅास्पिटलचा माजी कर्मचारी आणि एका व्यवस्थापकाचा सहभाग आहे.

    चारकोप शिवम हॅास्पिटलमध्ये बोगस लसीकरणाचे गैरप्रकार सुरू होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारत शिवम हॅास्पिटल बंद कले. ५ मार्च ते २८ एप्रिलदरम्यान शिवम हॅास्पिटल खासगी लसीकरण केंद्र होते. त्यावेळी १६ हजारांपेक्षा जास्त लशींच्या मात्रा देण्याचा कारभार या हॅास्पिटलमध्ये सुरू होता. तसेच १ लाख अधिक लशी थेट उत्पादकांकडून मिळवण्याचा हॅास्पिटल प्रशासनाचा उद्देश होता, अशी माहिती शोधपथकाने दिली आहे.
    मालाड मेडिकल संघटनेचा माजी सदस्य महेंद्र सिंग याच्या मदतीने लसीकरण केंद्रात नागरिकांची नोंदणी केली जात होती. हॅास्पिटल प्रशासनाला पुरेसा निधी न मिळाल्याने १ लाख लशींचे डोस विकत घेण्यात प्रशासनाला अडचण निर्माण झाली.

    शिवम हॅास्पिटलला खासगी लसीकरण केंद्र म्हणून बंद करण्यात आले होते. मात्र, असे असतानाही हॅास्पिटल प्रशासनाकडून आगाऊ नोंदणी केलेल्या नागरिकांना पाण्याचा वापर करुन बोगस लस देण्यात आल्या. या बोगस लसीकरणात हॅास्पिटल प्रशासनाचे डॉ. मनिष त्रिपाठी, निता पटारिया यांचा सहभाग आहे, अशी माहिती या प्रकरणात तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.

    तसेच हॅास्पिटल प्रशासनाच्या संकल्पनेचे काही दुष्परिणाम होतील का? याची शहानीशा करण्यासाठी त्रिपाठीचा विद्यार्थी करीम अली याचाही समावेश करण्यात आला होता. डॉ. मनिष त्रिपाठी, निता पटारिया आणि करीम अली या तिघांनाही पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.