kanagana ranaut in bjp

बिहार निवडणुकांपूर्वी कंगनाचा भाजपात प्रवेश करुन, तिला निवडणुकीच्या प्रचारात उतरवण्याची रणनीती आखली जात असल्याचीही चर्चा आहे. कंगना ही पहिली सिने अभिनेत्री होती जिने सुशांतसिंहच्या गूढ मृत्यूनंतर हे षडयंत्र असल्याचा उल्लेख तिने जाहीरपणे केला, इतक्यावरच न थांबता मुंबई पोलिसांच्या चौकशीवरही कंगनाने प्रश्न उपस्थित केले.

मुंबई : शिवसेनेविरुद्धच्या वादात अभिनेत्री कंगना रणौतला (kangana ranaut) ज्या पद्धतीने भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने पाठिंबा दर्शविला आहे, त्याचा फायदा बिहार निवडणुकीच्या प्रचारात (kangana ranaut election) भाजपाला होण्याची शक्यता आहे. बिहार निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी कंगनाला पावलापावलावर समर्थन दिले आहे. यामुळे बिहारच्या निवडणुकीत कंगनाला स्टार प्रचारक म्हणून भाजपा पुढे करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बिहार निवडणुकांपूर्वी कंगनाचा भाजपात प्रवेश करुन, तिला निवडणुकीच्या प्रचारात उतरवण्याची रणनीती आखली जात असल्याचीही चर्चा आहे. कंगना ही पहिली सिने अभिनेत्री होती जिने सुशांतसिंहच्या गूढ मृत्यूनंतर हे षडयंत्र असल्याचा उल्लेख तिने जाहीरपणे केला, इतक्यावरच न थांबता मुंबई पोलिसांच्या चौकशीवरही कंगनाने प्रश्न उपस्थित केले. इतकंच नाही तर या मुद्द्यावर आणि बॉलिवूडमधील घराणेशाहीवरही कंगनाने सातत्याने जाहीर वक्तव्य करीत बॉलीवूडमध्ये अनेक शत्रूही निर्माण केले. कंगनाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना सोशल मीडियावर चांगले समर्थनही मिळाले, या समर्थकांत मोठ्या प्रमाणात बिहारच्या जनतेचा समावेश होता. सुशांतसिंह प्रकरणात बिहारमध्ये शिवसेनेविरोधात वातारवरण चांगलंच तापले असून त्याचा फायदा भाजपा-जेडीयू या निवडणुकीत घेण्याची शक्यता आहे.

काँग्रेसही बॅकफूटवर

गेल्या दोन दिवसांचा घटनाक्रमाने बराच बदल होणार आहे. मुंबई मनपाने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर कंगना पीडित कार्ड खेळत शूर योद्ध्याच्या आविर्भावात वक्तव्ये करीत आहे. याच मुद्द्यावर बिहारच्या जनतेला एकजूट करण्याचा तिचा प्रयत्न असेल. कंगनाच्या प्रकरणात राष्ट्रीय पातळीवर होणारे नुकसान लक्षात घेता गुरुवारी काँग्रेस नेत्यांना जाहीर वक्तव्ये टाळण्याचा सल्ला पक्षाकडून देण्यात आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला बिहारमध्ये गमावण्यासारखे काहीच नसल्याने काँग्रेस आता या वादापासून लांब राहण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

कंगनाच्या प्रवेशासाठी भाजपाचे प्रयत्न

कंगनाला ज्या तत्परेतेने वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली, त्यावरुन कंगना भाजपाच्या किती जवळ आहे, याचा संदेश राजकीय वर्तुळात आधीच गेला आहे. तिचे कार्यालय तोडल्यानंतर तिच्याबाबत सर्वसामान्यांमधील सहानभूतीही वाढीस लागली आहे. त्यामुळे कंगनाने लवकरात लवकर भाजपात यावे, ही मुंबईतील भाजपाच्या नेत्यांची इच्छा आहे. कंगनाचे मुंबईची तुलना पीओकेशी केल्याचे वक्तव्य सोडल्यास, तिची आणि पक्षाची विचारधारा एकसारखी असल्याचे भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. याबाबत आशिष शेलार यांच्याकडे विचारणा केली असता, याबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेतला जील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. बिहारच्या निवडमुकीत कंगना स्टार प्रचारक असेल का, याचा निर्णयही केंद्रीय पातळीवरच हील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही- शिवसेना

कंगना भाजपाची टीम म्हणूनच काम करीत आहे, उद्या ती बिहार निवडणुकांत स्टार प्रचारक म्हणून दिसली तर आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.