कंगनाला उच्च न्यायालयाचा दिलासा, कार्यालयावरील कारवाईस तात्पुरती स्थगिती

कंगना राणौतच्या कार्यालयात तळ मजल्यावर कारवाई सुरु होती. (Kangana Office Demolished) बीएमसीचे कर्मचारी कार्यालयातून सर्व सामान घेऊन बाहेर पडले आहेत. बीएमसी तब्बल दीड तास कारवाई करत होते. उच्च न्यायालयाने कंगनाला गुरुवार ३ वाजेपर्यत स्थगिती दिली आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर (Kangana Ranaut Office) मुंबई महनगरपालिकेने कारवाई केली. याप्रकरणी कंगनाचे वकील रिझवान सिद्धीकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) तातडीने याचिका दाखल केली. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावर उच्च न्यायालयाने मनपाला कारवाई तुर्तास थांबवण्याचे आदेश दिले आहेत. कंगना राणौतला उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा दिाला आहे.

कंगना राणौतच्या कार्यालयात तळ मजल्यावर कारवाई सुरु होती. (Kangana Office Demolished) बीएमसीचे कर्मचारी कार्यालयातून सर्व सामान घेऊन बाहेर पडले आहेत. बीएमसी तब्बल दीड तास कारवाई करत होते. उच्च न्यायालयाने कंगनाला गुरुवार ३ वाजेपर्यत स्थगिती दिली आहे. कंगना राणैतने मुंबईची तुलना पीओकेशी केली होती. त्यामुळे शिवसेना आणि कंगनामध्ये चांगलीच जुंपली होती. मात्र शिवसनेशी शाब्दिक चकमक महागात पडल्याचे चित्र दिसत आहे.

मंगळवारी मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयाबाहेर नोटीस लावली होती. या नोटीसमध्ये कार्यालयात अनधिकृत बंधकाम झाल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच मनपाने २४ तासांची नोटीस बजावली होती.


मुंबई महानगरपालिकेने नोटीसची २४ तासांची मुदत संपल्यानंतर पालिकेनं आज सकाळपासून कारवाईला सुरुवात केली. कार्यालयावर हातोडा चालवला. हिमाचल प्रदेशातून कंगना मुंबईकडे रवाना झाली आहे. (Kangana in Mumbai) कंगना थोड्याच वेळात मुंबत दाखल होणार आहे.