भाजप नेते डॉ किरीट सोमैय्या
भाजप नेते डॉ किरीट सोमैय्या

ठाणे महानगरपालिकेनी २९ डिसेंबर २०२० रोजी ठाकरे सरकारला विनंती केली आहे, की या इमारती अधिकृत करण्यासाठी अम्हाला मुभा द्या. सोमैय्या म्हणाले की, सोनू सूद कंगना राणावत यांचे घर/कार्यालयाचे बांधकाम २४ तासात उध्वस्त करण्याचे आदेश उद्धव ठाकरे देतात.

मुंबई: कंगना राणावत आणि सोनू सुदला जो न्याय लावला, जगेला तो प्रताप सरनाईक यांना का नाही असा सवाल भाजप नेते किरिट सोमैय्या यांनी विचारला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील विहांग गार्डन बी१ बी२ या १३ मजली आणि १३ वर्ष जुन्या अनधीकृत इमारती अधिकृत करण्यासाठी आता ठाकरे सरकार पुढे सरसावले आहे असा आरोप भाजपनेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे.
सोमैय्या म्हणाले की, ठाणे महानगरपालिकेनी २९ डिसेंबर २०२० रोजी ठाकरे सरकारला विनंती केली आहे, की या इमारती अधिकृत करण्यासाठी अम्हाला मुभा द्या. सोमैय्या म्हणाले की, सोनू सूद कंगना राणावत यांचे घर/कार्यालयाचे बांधकाम २४ तासात उध्वस्त करण्याचे आदेश उद्धव ठाकरे देतात! परंतू १३ वर्ष फसवणूक करणार्‍या प्रताप सरनाईकला अभय का दिले जात आहे? असा खोचक प्रश्न विचारला आहे.