कंगना राणौत घेणार राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट

कंगनाने राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. या आधीही राज्यपाल यांनी राज्यसरकारला अनेक वेळी कोंडीत पकडले आहे. त्यामुळे आता कंगनाची भेट घेतल्यावर राज्यपाल आणि कंगना यांच्यात काय चर्चा होणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) सायंकाळी साडेचार वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेणार आहे. कंगना राजभवन येथे राज्यपालांची (Governor ) भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. कंगनाचे शिवसेनेसोबत चाललेल्या वादामध्ये राज्यपालांची भेट घेत असल्यामुळे चर्चांणा उधाण आले आहे.

राज्यीतल शिवसेना नेत्यात आणि कंगना राणौतमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमकी सुरु होत्या. या शाब्दिक वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तिला वाय दर्जीची सुरक्षा दिली आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेने तिच्या मुंबईतील कार्यालयावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी तोडकामची कारवाई केली आहे.

तसेच कंगना राणौतने मुख्यमंत्र्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच खवळले आहेत. कंगनाने राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. या आधीही राज्यपाल यांनी राज्यसरकारला अनेक वेळी कोंडीत पकडले आहे. त्यामुळे आता कंगनाची भेट घेतल्यावर राज्यपाल आणि कंगना यांच्यात काय चर्चा होणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.