मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी..; कंगनाने केलं मराठीत ट्विट

‘झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझं कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन’,जय हिंद जय महाराष्ट्र’, असं मराठीत ट्विट अभिनेत्री कंगना रणौतने केलं आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) महाराष्ट्र (Maharashtra)आणि मुंबईची (Mumbai)तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे, तिच्यावर टीकेची  झडीमार होत आहे. तसेच कंगना व शिवसेना (Shivsena) यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कंगनाने एक फोटो शेअर (Photo Share With Marathi Tweet) करत मराठीत ट्विट केलं आहे.

‘झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझं कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन’,जय हिंद जय महाराष्ट्र’, असं मराठीत ट्विट अभिनेत्री कंगना रणौतने केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज कंगनाच्या हाती तलवार देतानाचा हा फोटो आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी तिला हा फोटो पाठवल्याचं कंगनाने ट्विटमध्ये सांगितलं. ‘अनेक मीम्स मला मिळाले. हा एक फोटो मला माझे मित्र विवेक अग्निहोत्री यांनी पाठवला. असे कंगनाने सांगितलं आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती.त्यामुळे कंगनाने ट्विटरवरून अशाप्रकारे त्यांचा समाचार घेतला आहे.