राष्ट्रीय महिला आयोगाची आमदार सरनाईक यांच्या अटकेची मागणी, कंगनाला दिला होता इशारा

यावर प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे. अशा आशयाचे ट्विट सरनाईक यांनी केले आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरुन सतत ट्विटरवर सक्रिय आहे. कंगनाने (Kangana) मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखी वाटत आहे. असे वक्तव्य केले. त्यामुळे राज्यातील सर्व स्तरांतू तिच्यावर संताप व्यक्त होत आहे. यात राजकारणीपण अग्रभागी आहेत. कंगनाच्या या वक्तव्यावरुन शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Saranaik) यांनी कंगनाला धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. यामुळे अभिनेत्री कंगना रणौतच्या मदतीला राष्ट्रीय महिला आयोग धावून आलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अटकेची मागणी केली आहे.(National Commission for Women to demand the arrest of MLA Sarnaik)

यावर प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे. अशा आशयाचे ट्विट सरनाईक यांनी केले आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाची भूमिका काय ?

कंगनाच्या कोणत्याही ट्विटमध्ये असं कुठेचं वाटलं नाही, की ती देशद्रोही आहे किंवा तीने कोणत्याही व्यक्तीला धमकावलं आहे असं मतं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी व्यक्त केलं आहे. तसेच या प्रकरणावरुन शिवसेनेच्या नेत्यांची ‘महिलांनी तोंड बंद ठेवाव’ ही विचारधारा समोर येते. राष्ट्रीय महिला आयोगाने ही भूमिका कंगना अभिनेत्री आहे म्हणून घेतलेली नाही. उद्या जर कोणालाही अशी धमकी आली तर राष्ट्रीय महिला आयोगाची हीच भूमिका घेईल, असं रेखा शर्मा म्हणाल्या.