करुणा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत, म्हणतात ‘मी पहिली, पाचवी की सहावी पत्नी लवकरच पत्रकार परिषदेत सांगणार’

“या पत्रकार परिषदेत जे काही सत्य आहे म्हणजे मी पहिली पत्नी आहे की पाचवी पत्नी आहे की सहावी? या सर्व गोष्टींवर बोलणार आहे. आतापर्यंत मला खुप धमकावण्यात येतय. मी कुणाला घाबरत नाही. मी एक पतीव्रता नारी आहे. माझ्या आयुष्यातील 25 वर्ष मी माझ्या पतीला दिली आहेत. त्यामुळे मी कुणाला घाबरत नाही.” असं देखील करुणा मुंडे यांनी फेसबुक लाइव्ह मधे म्हटलं आहे.

  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर फसवणूकीचा आरोप करणाऱ्या करुणा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कारण त्यांऩी आता परळीत जाऊन थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यासमोर पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेत त्या त्यांच्या आईचा मृत्यू कसा झाला? सोबतच आणखी अनेक गोष्टींचा खुलासा करणार असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.

  या संदर्भातील माहिती करुणा मुंडे यांनी त्यांच्या ‘Karuna Dhananjay Munde’ या त्यांच्या पेजवर फेसबुक लाइव्ह द्वारे दिली आहे.

  या फेसबूक लाइव्हमधे करुणा मुंडे म्हणाल्या की, “अनेकजण माझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील सात महिन्यांपासून एक नसुटलेलं कोडं तुमच्यासमोर आहे. तुमच्यासमोरचं हे कोडं सोडवण्यासाठी मी रविवारी परळीत येणार येऊन माझ्या पतीच्या घरी पत्रकार परिषद घेणार आहे.” असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.

  मी पहिली पत्नी की पाचवी की सहावी?

  “या पत्रकार परिषदेत जे काही सत्य आहे म्हणजे मी पहिली पत्नी आहे की पाचवी पत्नी आहे की सहावी? या सर्व गोष्टींवर बोलणार आहे. आतापर्यंत मला खुप धमकावण्यात येतय. मी कुणाला घाबरत नाही. मी एक पतीव्रता नारी आहे. माझ्या आयुष्यातील 25 वर्ष मी माझ्या पतीला दिली आहेत. त्यामुळे मी कुणाला घाबरत नाही.” असं देखील करुणा मुंडे यांनी फेसबुक लाइव्ह मधे म्हटलं आहे.

  पंकजा मुंडे यांना जाहिर पाठिंबा

  याच लाइव्हमधे बोलताना करुणा म्हणाल्या की, “धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याविरोधात षडयंत्र रचलं आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत मी तुम्हाला साथ देणार. माझ्या पतीने मला अनेक नेत्यांबद्दल सांगितलं. पण मला त्यांच्यात पडायचं नाही. पंकजा मुंडे या माझ्या नणंद लागतात. घरातल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबतची ही माहिती मी देऊ शकते.”

  गोपीनाथ मुंडे यांनी फेकलेल्या तुकड्यांवर जगणारी लोक आज..

  ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फेकलेल्या तुकड्यांवर जगणारी लोकही आज त्यांच्याच मुलींना मागे टाकत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या विरोधात काय षड्यंत्र आखलं जात आहे? हे सुध्दा मी माझ्या पत्रकार परिषदेत स्पष्च करणार आहे.” असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.