aashish shelar

मुंबई: काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील बहुतांश भाग जलमय झाला आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्याने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुंबईत तुंबलेल्या पाण्यावरून भाजपा नेते आशिष शेलार(ashish shelar) यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. मुंबईकर हो, सरकारच्या दृष्टीने मुंबईतील पूर(mumbai flood) म्हणजे नेहमीचाच पावसाळा? शांतता राखा, बदल्या, टेंडर वाटप सुरू आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

मुंबईत निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर(thakregovernment) निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणाले की, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागांत पावसाने(rain) उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. उद्ध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत केली. त्यामुळे मुंबईकर हो, सरकारच्या दृष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा?शांतता राखा, बदल्या, टेंडर वाटप सुरू आहे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.

याशिवाय ट्विटरवर २ ट्विट करुन मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे. हिंदमाता, वरळीसह अनेक भागातील पाण्याचा निचरा का होत नाही? मुंबईकरांच्या घरातील पाणी का अजून कमी होत नाही?  ११६% नालेसफाईचे दावे कुठे गेले? रात्री अजून पाऊस झाला तर मुंबईकरांनी करायचे काय? कलानगरचे पाणी तातडीने ओसरते मग मुंबईतील अन्य ठिकाणांचे का नाही? हा प्रश्न शेलारांनी एका ट्विटमध्ये विचारला आहे तर अन्य एका ट्विटमध्ये,पाऊस जास्त पडला सांगत पावसावर खापर फोडू नका? नुसते फिरुन उपयोग काय? ब्रिटानियाचे पंपिंग स्टेशन पुर्ण क्षमतेने का चालत नाही ते सांगा?मायक्रो टनेलची कामे वेळेत पुर्ण का झाली नाही ते ही सांगा? पाण्याचा निचरा होण्यास ऐवढा विलंब कधी होत नव्हता, मग आता का विलंब होतोय हेही सांगा? असे प्रश्न विचारले आहेत.