कोविड-१९  वॅक्सीनच्या चाचणीसाठी केइएम रुग्णालयाला मिळाला हिरवा कंदील

-बुधवारपासून स्क्रीनिंग सुरु

मुबई: कोविड १९ (Covid-19)च्या वॅक्सीन चाचणी ला मंगळवारी एथिक कमिटीकडून हिरवा कंदील मिळाला आहे.मागील काही दिवसांपासून याबाबत चर्चा व पत्रव्यवहार सुरु होते, अखेर मंजूरी देण्यात आली आहे.

इंडियन कॉउंसिल ऑफ़ मेडिकल रिसर्च(ICMR) ने ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी ने तयार करण्यात आलेली वॅक्सीनच्या ट्रायल साठी मुंबईतील पालिकेचे केइएम आणि नायर या दोन रुग्णालयाची निवड केली होती. परंतु दरम्यानच्या काळात मडीसीनच्या साइड इफेक्ट मुळे पुणे सहित अन्य ठिकाणी सुरु असलेली ट्रायल थाम्बविण्यात आली होती. पन पुन्हा ही ट्रायल सुरु करण्याबाबत विचार केला जात आहे.

दरम्यान, केइएम रुग्णालयाचे डीन डॉ हेमंत देशमुख यांनी सांगितले की, मंगळवारी त्यांना ट्रायल साठी एथिक कमिटीने होकर कळविला असुन , बुधवारी ट्रायल होणार असून यात सहभागी होणाऱ्या व्हॉलंटीअर्सचे स्क्रींनिग करण्यात येणार आहे, यात १०० व्हॉलंटीअर्सचा समावेश आहे.