एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

भाजपवर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar ) यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

मुंबई. गेल्या काही वर्षांपासून भाजपसोबत वाढत्या मतभेदामुळे नाराज असलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तथापि खडसे मुंबईत दाखल होताच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. गेल्या काही दिवसांपासून एकांतवासात असलेले एकनाथ खडसे मंगळवारी मुंबईत दाखल झाले होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार खडसे शरद पवार यांची प्रथम भेट घेणार असून त्यानंतर दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतील. त्यामुळेच खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  जाणार असल्याच्या चर्चांना वेगही आला आहे.(eknath khadse will enter in rashtrawadi congress

दरम्यान याबाबत शरद पवार यांना विचारणा केली असता, एकनाथ खडसेंबाबत अशी कोणतीही भेट नियोजित नाही, त्यांच्या भेटीबद्दल विनंतीही करण्यात आली नाही, उद्या मी दिल्लीला जाणार आहे. परंतु आज भेट नाही, असे मोघम उत्तर देत खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील  प्रवेशावर भाष्य टाळले.

उल्लेखनीय असे की, काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. यात महाराष्ट्र राज्यातून पंकजा मुंडे, विनोद तावडे या नेत्यांचा समावेश करण्यात आला. मात्र यातून खडसेंना वगळण्यात आले होते.