aknath Khadse

माजी आमदार राम शिंदे यांनी म्हटले आहे की, एकनाथ खडसेंना या निर्णयामुळे पश्चाताप होणार आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही किंमत मिळणार नाही आहे. तसेच त्यांच्यासोबत कोणताही नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाही. असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांनी जी हिम्मत केली त्याचा त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही.

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse )यांनी भाजपा (BJP) पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये (NCP)  जाणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे भाजपाला विदर्भात खिंडार पडले आहे. खडसेंच्या या निर्णयामुळे भाजपामध्ये खळबळ माजली आहे. त्यांच्या पक्षांतरामुळे अनेक भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्याम भाजपाचे माजी आमदार राम शिंदे यांनीही खडसेंच्या पक्ष प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

माजी आमदार राम शिंदे यांनी म्हटले आहे की, एकनाथ खडसेंना या निर्णयामुळे पश्चाताप होणार आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही किंमत मिळणार नाही आहे. तसेच त्यांच्यासोबत कोणताही नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाही. असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांनी जी हिम्मत केली त्याचा त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होईल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. यामुळे भाजपाला मोठा हादरा बसला आहे.