मुंबई महापालिकेच्या जागतिक लस निविदा अर्ज प्रकरणात घोटाळा असल्याचा किरिट सोमैय्यांचा आरोप

सोमैय्या यांनी याबाबत महापालिका आयुक्त चहल यांना पत्र दिले आहे. ते म्हणाले की, राज्य सरकार प्रमाणेच पालिकेने जागतिक निविदा काढल्या. या शिवाय दिल्ली पंजाब या राज्यातही अश्या निविदा काढण्यात आल्या होत्या मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद आला नाही. मात्र मुंबई महापालिकेला नऊ प्रस्ताव प्राप्त झाले. पालिकेने कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचे सांगत सर्व प्रस्ताव नाकारले.

  मुंबई : भाजपचे माजी खासदार किरिट सोमैय्या यांनी मुंबई महापालिकेकडे जागतिक लस निविदेची माहिती मागितली आहे. १ कोटी डोस देण्यासाठी ज्या नऊ लस विक्रेत्यांनी अर्ज दाखल केले होते त्यांच्या बाबतची माहिती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सोमैय्या यांनी यावेळी या प्रकरणात घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सर्वच्या सर्वा प्रस्ताव कसे रद्द झाले याची माहिती देण्याची मागणी केली आहे.

  सर्व प्रस्ताव बनावट असल्याचा आरोप

  सोमैय्या यांनी याबाबत महापालिका आयुक्त चहल यांना पत्र दिले आहे. ते म्हणाले की, राज्य सरकार प्रमाणेच पालिकेने जागतिक निविदा काढल्या. या शिवाय दिल्ली पंजाब या राज्यातही अश्या निविदा काढण्यात आल्या होत्या मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद आला नाही. मात्र मुंबई महापालिकेला नऊ प्रस्ताव प्राप्त झाले. पालिकेने कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचे सांगत सर्व प्रस्ताव नाकारले.

  पत्रात सोमैय्या यानी सर्व प्रस्ताव बनावट असल्याचा आरोप केला आहे. या पैकी काही कंपन्या अलिकडेच स्थापन झाल्या होत्या. त्याना या कामाचा काही अनुभव नव्हता. तसेच त्यांच्याकडे त्यासाठी आवश्यक आर्थिक शक्ती आणि पात्रता देखील नव्हती. या निविदेच्या अटी शर्ती देखील वारंवार बदलण्यात आल्या असा आरोप सोमैय्या यानी केला.

  केवळ तीन प्रस्ताव दाखल

  त्यांनी सांगितले की मुदत संपण्यापूर्वी केवळ तीन प्रस्ताव दाखल झाले होते, मात्र काही तास आधी पाच निविदा भरण्यात आल्या. त्यापैकी बहुतांश या बेनामी आणि खोट्या कंपन्या आहेत. त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे देण्यात आली नाहित. त्यानंतर पालिकेने निविदेसाठी कालावधी देखील दिला होता असे सोमैय्या म्हणाले.