आयकर विभागाने भुजबळांची 100 कोटींची बेनामी मालमत्ता जप्त केल्याचा किरिट सोमय्यांचा दावा, भुजबळ म्हणतात तो मी नव्हेच

छगन भुजबळ यांची मरिन ड्राइव्ह येथील शंभर कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा भाजपनेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भातील माहिती सोमय्या यांनी सकाळी सात वाजता ट्वीट करत दिली. मात्र, या संपत्तीशी आपल्ला काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.

  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांची मरिन ड्राइव्ह येथील शंभर कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा भाजपनेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भातील माहिती सोमय्या यांनी सकाळी सात वाजता ट्वीट करत दिली. मात्र, या संपत्तीशी आपल्ला काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.

  काय आहे किरीय सोमय्या यांचा दावा

  किरीट सोमय्या यांनी सकाळी ट्वीट करत म्हटलं आहे की, “ठाकरे सरकारचे मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या ₹100 कोटींच्या बेनामी मालमत्ता BENAMI Properties आयकर विभागाने जप्त केल्या.”

  यापुढे बोलताना सोमय्या म्हणाले की, “कलकत्त्याच्या बोगस कंपन्यांद्वारे हे मनी लॉंड्रींग करण्यात आलं होतं. अंजली दमानिया आणि मी दोन वेगवेगळ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. आयकर विभागाने तशी प्रेसनोट सत्र न्यायालयाला दिली आहे. यानुसार त्यांना सात वर्षांपर्यंत जेल होऊ शकते.”

  तो मी नव्हेच भुजबळांचं स्पष्टीकरण

  या प्रकरणाबाबत पत्रकारांनी मंत्री भुजबळ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी “या संपत्तीशी माझा काहीही संबंध नाही. अर्शद सिद्दीकी हे या कंपनीचे मालक आहे. ही इमारत शेख जबार अब्दुल्लाह अल-सबाह यांच्या मालकीची होती. 24 डिसेंबर 2013 रोजी शेख जबार व मेसर्स असलिना अॅग्रो अॅड हॉल्टिकल्चर प्रायवेट लिमीटेड यांच्यात झालेल्या करारानुसार तिसध्या मेसर्स असलिना अॅग्रो अॅड हॉल्टिकल्चर प्रायवेट लिमीटेड यांच्या मालकीची झाली आहे. त्यामुळे या संपत्तीशी माझा काहीही संबंध नाही.” अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.