७२ कोविड छोटी रुग्णालये नॉन कोविड करण्याच्या निर्णयावर फेरविचार व्हावा : किरीट सोमय्या

मुंबईत गेल्या आठवडाभरात ११,०९१ रुग्ण समोर आले. त्यामुळे, आयसीयू बेड्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. पालिका रुग्णालये आणि आयसीयू बेड्सची (ICU Beds) संख्या वाढवण्याच्या जागी ती कमी करण्याचा प्रयत्न करतेय. त्यात पालिकेने ७२ कोविड उपचार देणारी छोटी रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेतला

 मुंबई : कोविडसाठी देण्यात आलेल्या ७२ छोटी रुग्णालयांना नॉन कोविड (Non-Covid) करण्याच्या निर्णयावर फेरविचार व्हावा असे मत भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी व्यक्त केले आहे. याबाबत किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  यांनी ट्विट केले आहे. मुंबईत गेल्या आठवडाभरात ११,०९१ रुग्ण समोर आले. त्यामुळे, आयसीयू बेड्सचा तुटवडा जाणवू लागला आहे.

पालिका रुग्णालये आणि आयसीयू बेड्सची (ICU Beds) संख्या वाढवण्याच्या जागी ती कमी करण्याचा प्रयत्न करतेय. त्यात पालिकेने ७२ कोविड उपचार देणारी छोटी रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, हा निर्णय मागे घेत पुन्हा या निर्णयावर फेरविचार करून ही रुग्णालये पुन्हा कोविड साठी खुली करावीत अशी मागणी केली आहे.

मध्यंतरी या रुग्णालयात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते आहे असे लक्षात आल्यावर पालिकेने ही रुग्णालये कोविड साठी बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही रुग्णालये बंद झाल्यामुळे आणि मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आयसीयू बेड्सची कमतरता भासू लागली आहे. गुरुवारी एका दिवसात दोन हजार रुग्णांची एकाच दिवशी भर पडली. त्यामुळे, सक्रिय रुग्णांची संख्या २६,६३२ एवढ्यावर पोहोचली आहे.