किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार : हसन मुश्रीफ

भाजप नेते किरीट सोमय्या सध्या महाविकास आघाडी सरकारवर थेट हल्ला करत आहेत. अजून एका मंत्र्यांचं नाव बाहेर काढणार असं म्हणत किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला आहे. दरम्यान त्यावर आता हसन मुशीरफ यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

  मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या सध्या महाविकास आघाडी सरकारवर थेट हल्ला करत आहेत. अजून एका मंत्र्यांचं नाव बाहेर काढणार असं म्हणत किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला आहे. दरम्यान त्यावर आता हसन मुशीरफ यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

  हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?

  किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहेत. असं मंत्री मुश्रीफ म्हणाले.

  तसेचं मी अनेक दिवसांपासून सांगत होतो, माझा पक्ष आणि पवार साहेबांवर आरोप झाले. त्याला मी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे माझ्यावर आरोप होणार ही खात्री होती . या आरोपांचा मी निषेध करतो, त्यांच्या CA पदवीवर शंका येते. या आधीच धाड पडली मात्र त्यांना काहीच मिळालं नाही. सोमय्या यांना यातील काही माहिती नाही. त्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन माहिती घ्यायला हवी होती. चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्या सांगण्यावरून हे आरोप झाले. मी सोमय्या यांच्यावर फौजदारी 100 कोटींचा दावा दाखल करणार. दोन आठवड्यात कोल्हापूर कोर्टात दावा दाखल करणार. असल्याचं यावेळी मश्रीफांनी सांगितलं.

  रस्ते घोटाळ्याबाबत तक्रार करणार

  चंद्रकांत पाटील यंच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपतकडे तक्रार करणार. समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू. घाटगे यांचे कार्यकर्ते दोन दिवसा पासून याची चर्चा करत होते. म्हणून मी सुद्धा आधीच निरोप दिला होता. अमित शहा यांच्या मैत्रीमुळेच चंद्रकांतदादांना पद मिळालं. त्यांना सामाजिक काम करता येत नाही. त्यांना कोल्हापूर सोडून पुण्याला जावं लागलंया आहे.

  किरीट सोमय्या काय म्हणाले?

  किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे. बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि (CRM Systems PVT LTD ) ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ (Navid Mushrif) यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, 2 कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे.

  इडीकडे अधिकृत तक्रार

  बाप बेटे दोघांच्या 127 कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत. हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. 2018- 19 मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. बेनामी ट्राझॅक्शन 127 कोटींचे व्यवहार समोर आले आहेत. उद्या मी मुंबई इडीकडे अधिकृत तक्रार करणार आहे. 2700 पानांचे पुरावे देणार आहे. माझ्याकडे 2 मंत्र्यांचे फाईल तयार होते, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन मंत्री होते, त्यापैकी एकाचं प्रकरण आज मी सांगितले आहे.