मुंबईत एकाच ठिकाणी ५००० खाटा?, ठाकरे सरकार जवाब दो, किरिट सोमय्या यांचा सवाल…

साथीच्या आजारांवर उपचार करण्यासाठी पाच हजार खाटांचे विशेष रूग्णालय ( Special Hospital ) बांधण्यासाठी महापालिकेने (BMC) अखेर मुलुंड (Mulund) पूर्व द्रुतगती महामार्गावरील २२ एकर जागेची निवड केली आहे. ही जागा खासगी मालकिची असल्याने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी जागेची मोजणी करून किंमत निश्चित (Decision)  केल्यानंतर ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया (Process) सुरू होणार आहे. दरम्यान, पाच हजार खाटांचे विशेष रूग्णालय बांधण्यासाठी २२ एकर जागेची निवड मुलुंडमध्ये करण्यात आल्याबाबत भाजपचे नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

मुंबई : साथीच्या आजारांवर उपचार करण्यासाठी पाच हजार खाटांचे विशेष रूग्णालय ( Special Hospital ) बांधण्यासाठी महापालिकेने (BMC) अखेर मुलुंड (Mulund) पूर्व द्रुतगती महामार्गावरील २२ एकर जागेची निवड केली आहे. ही जागा खासगी मालकिची असल्याने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी जागेची मोजणी करून किंमत निश्चित (Decision)  केल्यानंतर ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया (Process) सुरू होणार आहे. तसेच जागा निश्चित करण्यासाठी जमीन ह्स्तांतरण, विकास नियोजन, आरोग्य खाते, वास्तुविशारद, विधी आणि वित्त भागातील अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. दरम्यान, पाच हजार खाटांचे विशेष रूग्णालय बांधण्यासाठी २२ एकर जागेची निवड मुलुंडमध्ये करण्यात आल्याबाबत भाजपचे नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

“ठाकरे सरकार जवाब दो”, किरीट सोमय्या यांनी सांगतिले की, साथीच्या आजारांवर उपचार करण्यासाठी पाच हजार खाटांचे विशेष रूग्णालय बांधण्यासाठी २२ एकर जागेची निवड मुलुंडमध्ये करण्यात आली आहे. मुंबईत एकाच ठिकाणी ५००० खाटा? की त्याचे नुसते भूमी अधिग्रहण ?? मी आरटीआय अंतर्गत व्यवहार्यता, वित्त आणि जमीन यासह सर्व तपशील उघड करण्यासाठी अर्ज केला आहे. तसेच या पत्राद्वारे त्यांनी अनेक प्रश्न मांडले आहेत.

साथीच्या आजारांसाठी मुंबईत महापालिकेचे १२५ खाटांचे कस्तुरबा रूग्णालय आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाल्यानंतर अशा विशेष रूग्णालयाची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली. तसेच रूग्णांची संख्या एप्रिल-मे महिन्यात वाढत गेल्यामुळे खाटांची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक प्रयत्नांनंतर मुलुंड आणि भांडुप अशा दोन जागांचा पर्याय पालिकेला मिळाला. त्यानंतर अंतिम निर्णयासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीने पाहणी करून मुलुंड पूर्व येथील २१.७० एकर जागा निश्चित केली आहे.