सचिन वाझे वसुली गॅंगने हजारो कोटी रुपये कमावले! विभिन्न खात्यांकडून तपास करण्याची सोमय्यांची मागणी

सचिन वाझे प्रकरणात कोट्यवधींची उलाढाल झालेली आहे. हा पैसा नेमका कुठून आला आणि कुठे गेला, याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. त्यासाठी केवळ एक यंत्रणा पुरेशी ठरणार नाही. अनेक यंत्रणांनी यात लक्ष घालून तपास करावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून केलीय. एनआयए, ईडी, रिझर्व्ह बँक, रजिस्ट्रार ऑफ कंपनी आणि इन्कम टॅक्स अशा विविध विभागांनी यात लक्ष घालून चौकशी करावी, अशी मागणी सोमय्यांनी केलीय. 

    प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ पेडर रोडला गाडीत ठेवण्यात आलेली स्फोटकं आणि सचिन वाझे यांचा या प्रकरणातला सहभाग या बाबी अत्यंत वादग्रस्त असून त्याची गंभीर चौकशी व्हावी, या मागणीसाठी विरोधी पक्ष भाजप आक्रमक झालाय. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कुठल्याही एका एजन्सीऐवजी अनेक एजन्सीनी यात लक्ष घालावं, अशी मागणी केलीय.

    सचिन वाझे प्रकरणात कोट्यवधींची उलाढाल झालेली आहे. हा पैसा नेमका कुठून आला आणि कुठे गेला, याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. त्यासाठी केवळ एक यंत्रणा पुरेशी ठरणार नाही. अनेक यंत्रणांनी यात लक्ष घालून तपास करावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून केलीय. एनआयए, ईडी, रिझर्व्ह बँक, रजिस्ट्रार ऑफ कंपनी आणि इन्कम टॅक्स अशा विविध विभागांनी यात लक्ष घालून चौकशी करावी, अशी मागणी सोमय्यांनी केलीय.

    पैसा कुठून आला, कुठे गेला कॅश ट्रेल, बीटकॉईनचा उपयोग नेमका कसा झाला, बेनामी ट्रान्झॅक्शन कसे झाले, ऑफशोर कंपन्या आहेत, त्यांचा नेमका यात काय सहभाग आहे, या सगळ्याचा तपासय व्हायला हवा, अशी मागणी सोमय्यांनी केलीय.