3 ministers dealing with women; What does Kirit Somaiya say about Dhananjay Munde case ...

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे(dhanjay munde) यांनी काल रेणू शर्मा(renu sharma) या महिलेने आरोप केल्यानंतर खुलासा करताना महत्त्वाची माहिती दिली. ही माहिती त्यांनी निवडणूक शपथ पत्रामध्ये जाहीर न केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या(kirit somayya) यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे(dhanjay munde) यांनी काल रेणू शर्मा(renu sharma) या महिलेने आरोप केल्यानंतर खुलासा करताना महत्त्वाची माहिती दिली. ही माहिती त्यांनी निवडणूक शपथ पत्रामध्ये जाहीर न केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या(kirit somayya) यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात भाजप नेते किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मुंडे यांच्या विरोधात पत्नी, मुले आणि मालमत्तांबद्दल तथ्ये लपविल्याप्रकरणी आणि महत्त्वाची माहिती जाहीर न केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे, असेही किरीट सोमय्यांनी सांगितले.

धनंजय मुंडे यांनी दोन बायकांच्या नावे मालमत्ता खरेदी केल्याची कबूली दिली आहे. तसेच रेणू शर्मा यांच्याशी संबंध असल्याचे मान्य केले. मात्र ऑक्टोबर २०१९मध्ये निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दोन बायका आणि मुलांची माहिती लपवली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री बंगले लपवतात तर त्यांचे मंत्री बायकांची माहिती लपवतात असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा,गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे अथवा निवृत्त न्यायाधीश यांच्या कमिटी कडे सोपवावा,शर्मा भगिनींना संरक्षण द्यावे, दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याने आणि त्याचा उल्लेख निवडणूक प्रतिज्ञापत्रात न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द व्हावे,तसेच द्विभाऱ्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले असल्यास कार्यवाही व्हावी अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर निषेध आंदोलने करणार असल्याचा इशारा भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली आहे.
तर भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी निपक्षपातीपणे चौकशी करावी,पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कितीही मोठा नेता असुदे दोषींना पाठिशी घालू नका.जोपर्यंत संपूर्ण तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले पाहिजे असे सांगून चित्रा वाघ म्हणाल्या की, अशा मोठ्या घटनांमध्ये पीडिता व तिच्या कुटुंबियांवर दबाव येऊ शकतो पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकते तपास कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे  नैतिकता दाखवत धनंजय मुंडे यांनी आपल्या पदावरून पायउतार व्हावे अशी मागणी त्यांनी केली,