‘मेट्रो प्रकल्प ५ वर्षे रखडणार, सरकारचा राजहट्ट आणि बालहट्ट महागात पडणार’ – किरीट सोमय्यांची टीका

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “उच्च न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांना मुंबई मेट्रो कांजूर शेड जमीन आदेश मागे घेण्यास / पुनरावलोकन करण्यास सांगितले! ठाकरे सरकारच्या राजहट्ट बालहट्टासाठी पाच वर्षे व पाच हजार कोटी रुपये मोजावे लागणार.”

मुंबई मेट्रो-३ प्रकल्पासाठी(metro project) कांजूरमार्ग येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत उच्च न्यायालयाने(high court) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जिल्हाधिकारी आपला आदेश मागे घेऊन सगळ्या पक्षकारांची नव्याने सुनावणी घेणार की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश  प्रक्रियेला अनुसरून नसल्याचा निष्कर्ष देऊन तो आम्ही रद्द करू? अशी विचारणा न्यायालयाने सरकारला केली. न्यायालयाच्या या भूमिकेनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या(kirit somayya) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.


भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “उच्च न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांना मुंबई मेट्रो कांजूर शेड जमीन आदेश मागे घेण्यास / पुनरावलोकन करण्यास सांगितले! ठाकरे सरकारच्या राजहट्ट बालहट्टासाठी पाच वर्षे व पाच हजार कोटी रुपये मोजावे लागणार.”
याआधी भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकावर टीका केली. “अहंकारी राजाच्या कांजूरमार्गला मेट्रो कारशेड उभारण्याच्या “डीजे” वाजवण्याला उच्च न्यायालयाने चांगलींच तंबी दिली. कोट्यावधीचे नुकसान झाले त्याला जबाबदार कोण? गेले वर्षभर मुंबईकरांच्या मेट्रोचा हा खेळ खंडोबा करुन डीजे डान्स करणाऱ्या ठाकरे सरकारने जनतेची आता माफी मागावी!” असं शेलार यांनी म्हटलं आहे.
“न्यायालयाने स्पष्ट शब्दात कांजूरमार्गच्या निर्णयाबाबत सरकारला फटकारले आहे. पुन्हा सुनावणी घेऊन निर्णय होईपर्यंत, असे सांगत आरे कारशेड का नको? असा सवाल ही केलाय. शास्त्रीय गायनाच्या रंगलेल्या मैफलीत वर्षभर “स्थगितीचे नकारात्मक” डीजे कोण वाजवतेय हे उघड झालेच ना?” असा टोला देखील शेलार यांनी लगावला आहे.