प्र‌‌‌‌वीण परदेशींना बनविले बळीचा बकरा – किरिट सोमय्या

मुंबई: मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हे रोखण्यात राज्य सरकार आणि महापालिका पूर्णपणे अपयशी ठरलेले असताना केवळ प्रवीण परदेशी यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांना या प्रकरणात बळीचा

मुंबई:  मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.  हे रोखण्यात राज्य सरकार आणि महापालिका पूर्णपणे अपयशी ठरलेले असताना केवळ प्रवीण परदेशी यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांना या प्रकरणात बळीचा बकरा बनविण्यात आले असल्याची प्रतिक्रीया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांची जबाबदारी ही मुख्यमंत्री आणि मुंबईच्या पालकमंत्र्यांची आहे, अशी टीकाही सोमय्या यांनी केली आहे. परदेशी यांच्यावर अपयशाचे खापर फोडण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले. आहे. ज्या अश्विनी भिडे यांचा सरकारने बदली करुन अपामन केला होता, त्यांचीच पुन्हा गरज सरकारला वाटायला लागली आहे. असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. मुंबईत कोरोना नियंत्रणात येत नसल्याने राज्य सरकारवर टीका करण्यात येत होती. केंद्र सरकारकडूनही याबाबत दबाव होता. यामुळेच परदेशी यांची बदली झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे,.