ठाकरे सरकारच्या वाझे गँगने केली मनसुख हिरेनची हत्या, कुटुंबालाही येतात धमकीचे फोन – किरीट सोमय्यांचा आरोप

ठाकरे सरकारच्या(thakre government) वाझे गँगने(waze gang) मनसुख हिरेन यांची हत्या(mansukh hiren murder case) केली असल्याचा आरोप किरीट सोमय्या (kirit somayya)यांनी केला आहे. सचिन वाझे यांना मुंबई पोलीस सेवेत का घेतले. याची चौकशी व्हावी यासाठी NIA ला पत्र पाठवणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.

    मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या(kirit somayya) यांनी मनसुख हिरेन(mansukh hiren murder case) यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्या परिवाराला धमकीचे फोन येत आहेत. ते प्रचंड तणावात आहेत. हिरेन परिवाराला सुरक्षा देण्यासाठी गृहमंत्री अमित शहांना पत्र पाठवणारं असल्याचं सोमय्या बोलत होते. भिवंडीत लसीकरण केंद्राला भेट देण्यासाठी सोमय्या आले होते. त्यावेळी माध्यमाशी संवाद साधतांना सोमय्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

    सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात अनेक आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांना मुंबई पोलीस सेवेत का घेतले. याची चौकशी व्हावी यासाठी NIA ला पत्र पाठवणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. हिरेन प्रकरणात भाजपचा हात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे.

    दरम्यान याबाबत किरीट सोमय्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे सचिन सावंत हिरेन प्रकरण भरकटण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीस तुमचे वाझेही तुमचाच मग हिरेन प्रकरणात पंधरा दिवस सरकार व पोलीस झोपा काढत होते काय ? की हे सर्व जण ५० कोटींच्या वासुलीत व्यस्त होते असा आरोप सोमय्यांनी केला असून सचिन वाझेचा बोलविता धनी देखील तुरुंगात जाणार असल्याचा विश्वास सोमय्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.