मुंबईत संचारबंदी लागू करण्यासंबंधी महापौरांनी दिले संकेत

मुंबईत संचारबंदी लागू करण्याबाबत विचार सुरू आहे. तसेच बाजारात होणारी भली मोठी गर्दी पाहता. ज्या ठिकाणी जास्त गर्दी होणारी बाजार आहेत. ते दुसऱ्या मार्गावर वळवण्याचा विचार सध्या सुरू आहे. परंतु पुन्हा एकदा शहरात लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्व मुंबईकरांनी एकत्र येणं गरजेचं आहे. असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

    मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शहरांतील अनेक भागांत संचारबंदी आणि लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. परंतु मुंबईत सुद्धा कोरोना रूग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत संचारबंदी लागू करण्यासंबंधी संकेत दिले आहेत.

    मुंबईत संचारबंदी लागू करण्याबाबत विचार सुरू आहे. तसेच बाजारात होणारी भली मोठी गर्दी पाहता. ज्या ठिकाणी जास्त गर्दी होणारी बाजार आहेत. ते दुसऱ्या मार्गावर वळवण्याचा विचार सध्या सुरू आहे. परंतु पुन्हा एकदा शहरात लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्व मुंबईकरांनी एकत्र येणं गरजेचं आहे. असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

    दरम्यान, औरंगाबाद , नागपूर , अमरावतीसह काही शहरांमध्ये अंशत: लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का अशी चर्चा सुरू आहे. पण, राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार नाही, कडक निर्बंध लावले जातील, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.