Journalist Welfare Fund

येत्या मंगळवारपर्यंत कोणता पुरवठादार लसीकरण करू शकतो(Vaccination) हे स्पष्ट झाल्यावर लसीसाठी कंत्राट दिले जाईल अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांनी दिली.

    मुंबई: लसीचा तुटवडा(Vaccine Shortage) असल्याने मुंबई महापालिकेने(BMC) ग्लोबल टेंडर(Global Tender) मागवले आहे. या ग्लोबल टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी ९ पुरवठादारांनी प्रस्ताव दिले आहे. या पुरवठादारांच्या कागदपत्रांची आणि लस बनविणाऱ्या कंपन्यांसोबत कोणत्या प्रकारचे व्यावसायिक संबंध आहेत याची छाननी केली जात आहे. येत्या मंगळवारपर्यंत कोणता पुरवठादार लसीकरण करू शकतो(Vaccination) हे स्पष्ट झाल्यावर लसीसाठी कंत्राट दिले जाईल अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांनी दिली.

    मुंबई महापालिकेने लसीच्या पुरवठयासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुरवठादार कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. १० कंपन्यांनी प्रस्ताव पाठवले होते. मात्र त्यापैकी एका कंपनींने माघार घेतल्याने ९ पुरवठादार राहिले आहेत. या ९ पुरवठादारांच्या कागदपत्रांची तसेच लस उत्पादक कंपनीसोबत असणाऱ्या कायदेशीर संबंधांची तपासणी केली जात आहे. यासाठी पालिकेचे दोन अतिरिक्त आयुक्त काम करत आहेत. टेंडरबाबत संपुर्ण माहिती आणि कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. संपूर्ण खात्री पटल्यावर टेंडर दिले जाईल. ग्लोबल टेंडरमध्ये नक्की यशस्वी होऊ असे महापौर म्हणाल्या.