Koregaon-Bhima violence case Death of Stan Swamy due to various ailments High Court information of Holy Family Hospital

एनआयएने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात स्टॅन स्वामी यांना एल्गार परिषद प्रकरणी दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत अटक केली होती. तेव्हापासून स्वामी तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होते. त्यांना पार्किन्सन्सचा आजार होता. त्यामुळे स्वामी यांनी उच्च न्यायालयात अपील केले आहे. याआधी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, स्वामी यांची तब्येत ढासळत असून त्यांच्यावर योग्य वेळी उपचार होण्यासाठी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने स्वामी यांना होली फॅमिली खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

    मुंबई : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदप्रकरणी अटकेत असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि फादर स्टॅन स्वामी (84) यांनी सोमवारी वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्याबाबत होली फॅमिली रुग्णलायाकडून मुंबई उच्च न्यायालयात माहिती देण्याता आली. पार्किन्सन्स, कोरोना, न्यूमोनिया आणि इन्फेक्शन इत्यादी आजारांमुळे स्वामींचा मृत्यू झाला. चारही आजार जुनेच आहेत. त्यामुळे शवविच्छेदन न करताच मृत्यूचा दाखला दिला जाऊ शकतो, अशी माहिती होली फॅमिली रुग्णालयाचे डॉक्टर इयान डिसूझा यांनी न्यायालयाला दिली.

    एनआयएने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात स्टॅन स्वामी यांना एल्गार परिषद प्रकरणी दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत अटक केली होती. तेव्हापासून स्वामी तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होते. त्यांना पार्किन्सन्सचा आजार होता. त्यामुळे स्वामी यांनी उच्च न्यायालयात अपील केले आहे. याआधी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, स्वामी यांची तब्येत ढासळत असून त्यांच्यावर योग्य वेळी उपचार होण्यासाठी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने स्वामी यांना होली फॅमिली खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

    शनिवारीच्या सुनावणीदरम्यान स्वामी यांच्यावर आयसीसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांच्या रुग्णलायातील मुक्कामामध्ये न्यायालयाकडून वाढ करण्यात आली होती. मात्र, शनिवारीच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यानंतर त्यांची तब्येत आणखी ढासळली. त्यांना वाचविण्यासाठी आम्ही आवश्यक सर्व उपचार केले मात्र, सोमवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती होलीफॅमिली रुग्णलायाकडून डॉ. डिसूझा यांनी न्या. एस. एस. शिंदे आणि न्य़ा. एन. जमादार यांच्या खंडपीठासमोर दिली. त्यांना झालेले चारही आजार जुनेच असल्यामुळे मृत्यूचे कारण आम्हाला माहीती आहे. परिणामी शवविच्छेदन न करताच मृत्यूचा दाखला दिला जाऊ शकतो, असेही त्यांना सांगितले. त्यावर स्टॅन स्वामी हे न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने शवविच्छेदन अहवाल आणि फौजदारी दंड संहितेच्या कलम १७६प्रमाणे न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी करणे योग्य ठरेल असे त्यांच्यावतीने बाजू मांडताना अॅड. मिहिर देसाई यांनी सांगितले.

    मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनीही मान्यता दिली. तसेच तळोजा कारागृहतील रुग्णालयात असताना स्वामींना तीनदा रुग्णालयात दाखल करावे लागले. करोनाची लागणही झाली. तळोजा कारागृह प्रशासन, राज्य सरकार, एनआयएने अक्षम्य हलगर्जीपणा केला असल्याचा आऱोप वकील अॅड. मिहिर देसाई यांनी केला. त्याला अतिरिक्ति सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनीही विरोध करत स्वामी यांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले. दुसरीकडे, फादर स्टॅन स्वामी हे ख्रिस्ती धर्मगुरू होते. त्यांना कुटुंब नव्हते. त्यामुळे सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य फादर फ्रेझर मस्कारेन्हास यांच्याकडे त्यांचा पार्थिव देह देण्यात यावा, अशी विनंती अॅड. देसाई यांनी खंडपीठाने केली.

    त्यावर खंडपीठाने सर्वप्रथम स्वामी यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आणि राज्य सरकारने शवविच्छेदनाची आजच्या आज व्यवस्था करावी. त्यानंतर फौजदारी दंड संहितेन्वये आवश्यक चौकशी पूर्ण होताच पार्थिव देह फादर फ्रेझर यांच्या ताब्यात द्यावा. त्यानंतर मुंबईतच करोना आपत्ती काळातील प्रमाणित कार्यप्रणालीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात यावे, निर्देश खंडपीठाने दिले. तसेच पुढील मंगळवारी स्वामीवरील वैद्यकीय अहवाल तळोजा कारागृह प्रशासनाला न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही दिले.