Koregaon-Bhima violence case Death of Stan Swamy due to various ailments High Court information of Holy Family Hospital

एनआयनआयएने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात स्टॅन स्वामी यांना एल्गार परिषद प्रकरणी दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत अटक केली होती. तेव्हापासून स्वामी तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होते. त्यांना पार्किन्सन्सचा आजार होता. त्यामुळे स्वामी यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अपील केले आहे. याआधी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, स्वामी यांची तब्येत ढासळत असून त्यांच्यावर योग्य वेळी उपचार होण्यासाठी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने स्वामी यांना होली फॅमिली खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. 5 जुलै रोजी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांची तब्येत आणखी ढासळली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी स्वामींच्या न्यायप्रविष्ट असलेल्या अपिलावर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.

    मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद आरोप प्रकरणातील दिवंगत आरोपी फादर स्टॅन (84) स्वामी यांच्याबाबतीत जे काही घडलं ते अत्यंत दुदैवी आणि दुर्भाग्यपूर्ण होते. प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळविण्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र,  लोकांना अनेक वर्ष कारागृहातच पडून रहावे लागते. खटला न्यायालयात उभाच राहत नाही. तसे असले तरीही न्याय प्रक्रिया पार पाडत असताना आम्हाला मानवतेचा दृष्टीकोन बाजूला सारावा लागतो. अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

    एनआयनआयएने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात स्टॅन स्वामी यांना एल्गार परिषद प्रकरणी दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत अटक केली होती. तेव्हापासून स्वामी तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होते. त्यांना पार्किन्सन्सचा आजार होता. त्यामुळे स्वामी यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अपील केले आहे. याआधी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, स्वामी यांची तब्येत ढासळत असून त्यांच्यावर योग्य वेळी उपचार होण्यासाठी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने स्वामी यांना होली फॅमिली खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. 5 जुलै रोजी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांची तब्येत आणखी ढासळली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी स्वामींच्या न्यायप्रविष्ट असलेल्या अपिलावर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.

    तेव्हा, स्टॅन स्वामीच्या निधनाबद्दल सोशल मिडियावर अनेक मेसेज आणि मिम्स वायरल झाले. त्यावर फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनावरून टीका करणाऱ्यांना विसर पडला आहे की, याच कोरेगाव-भीमा प्रकरणात राज्य सरकारचा तीव्र विरोध झुगारून आम्हीच डॉ. वरवरा राव यांना जामीन मंजूर केला होता, हनी बाबूंना त्यांच्या निवडीच्या रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगीही दिली. अशा शब्दात खंडपीठाने होणाऱ्या टिकेवर आपले मौन सोडले. कोणत्याही प्रकरणात आम्हाला राज्यघटनेतील तत्त्वे, नियमावली, सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे इत्यादी लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा लागतो.

    न्याय प्रक्रिया पार पाडत असताना आम्हाला मानवतेचा दृष्टीकोन बाजूला सारावा लागतो. स्वामी यांच्या बाबतीत जे घडले ते अत्यंत दुर्दैवी होते, अशा शब्दात न्या. शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच फादर स्टॅन स्वामी यांचे व्यक्तिमत्व उमदे होते, समाजासाठी त्यांचे भरीव असे योगदान राहिले आहे. मात्र, याप्रकरणातील कायदेशीर लढाईचा भाग वेगळा आहे. आम्हीही त्यांचा अंत्यविधी ऑनलाईन पाहिला, त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला असल्याचेही न्या. शिंदेनी पुढे नमूद केले.

    त्यावर आम्ही न्यायालयाचा आदर करतो, न्यायालयाने वेळोवेळी आमची बाजू ऐकून घेतली, वैद्यकीय सेवा मिळवून दिली. त्याबाबत आमची कोणतीही तक्रार नसून न्यायालयाने आरोपींच्या हक्कांचे नेहमीच रक्षण केले, कामकाजाचा दिवस नसतानाही न्यायालयाने खटला चालविला आहे. मात्र, सोशल मीडियावर नियंत्रण मिळवणे कोणाच्याही हातात नाही, अशा शब्दात स्वामींची बाजू मांडणारे अॅड. मिहिर देसाई यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांची बाजू ऐकून घेत खंडपीठाने सुनावणी २३ जुलैपर्यंत तहकूब केली.