आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी बनवली कोव्हीड-१९ टेस्ट बस

मुंबई :देशात पसरत असलेल्या कोरोनाबरोबर लढा देण्यासाठी सर्वच प्रयत्न करत असताना आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यानी कोव्हीड - १९ टेस्ट बस तयार केली आहे. ही बस देशातील पहिली कोव्हीड-१९

 मुंबई : देशात पसरत असलेल्या कोरोनाबरोबर लढा देण्यासाठी सर्वच प्रयत्न करत असताना आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यानी कोव्हीड – १९ टेस्ट बस तयार केली आहे. ही बस देशातील पहिली कोव्हीड-१९ टेस्ट बस ठरली आहे. यामध्ये जेनेटिक टेस्टिंग, कोणत्याही संपर्काशिवाय स्वॅब नमुने घेणे, टेलिरेडिओलॉजीची सुविधा आहे. आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी बनवलेली कोव्हीड -१९ टेस्ट बस ही पूर्णतः भारतीय तंत्रज्ञानाने बनवण्यात आली आहे. या बसमध्ये असलेल्या जेनेटिक टेस्टिंग, कोणत्याही संपर्काशिवाय स्वब नमुने घेणे, टेलिरेडिओलॉजीची सुविधा आहेत. बसमधील लॅबमध्ये अशाप्रकारची सुविधा असलेली ही जगातील पहिली लॅब ठरली आहे. कोडोय टेक्नॉलॉजी आणि आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ही बनवली आहे. 

बसमध्ये डिजिटल एक्सरे, टेलिरेडिओलॉजी, संपर्काशिवाय स्वॅब घेणे, आरएनए टेस्टिंग या बसमध्ये सुविधा असणार आहे. ही बस ३८४ स्क्वेअर फूट असून एवढ्या जागेत ही लॅब उभारण्यात आली आहे. ही लॅब पावसाळ्यातही वापरता येणार आहे. या बसमध्ये रोबोटीक अल्ट्रा साउंड सिस्टीम बसवण्यात आली आहे. नमुने गोळा करणे, टेलिमेडिसीन, जेनेटिक टेस्टिंगची सुविधा असलेल्या या मेगालॅबमध्ये प्रत्येक महिन्याला ५० लाख चाचण्या करण्याची क्षमता आहे. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.