पान खाऊन महिलेच्या अंगावर थुंकणाऱ्याला वाकोला पोलिसांनी केले गजाआड

मुंबई: सांताक्रुझ पूर्व येथील कलिना भागात एक स्कुटरस्वार तरुण पान खाऊन महिलेवर थुंकून फरार झाला. वाकोला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला कुर्ल्यातून अटक केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर

मुंबई: सांताक्रुझ पूर्व येथील कलिना भागात एक स्कुटरस्वार तरुण पान खाऊन महिलेवर थुंकून फरार झाला. वाकोला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला कुर्ल्यातून अटक केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपीने महिलेला त्रास देण्यासाठी तिच्यावर थुंकल्याचा गुन्हा कबूल केला.

कलिनाच्या गीता नगरमध्ये राहणारी एक महिला ६ एप्रिलला दिड वाजता आवश्यक सामान आणण्यासाठी घराबाहेर पडली. घरापासून ती मुख्य रस्त्यावर आल्यावर एक तरुण स्कुटर चालवत त्या महिलेच्या जवळ आला. तो तरुण त्या महिलेवर थुंकून पळून गेला. आरोपी तरूणाने साडीवर पानाची पिंक थुंकल्याने ती महिला गोंधळली. मात्र या महिलेने आरोपीला धडा शिकवाायचे ठरवले. तिने वाकोला पोलीस स्थानकात तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक कैलाश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शिवशंकर भोसले आणि उपनिरिक्षक सातपुते यांनी या घटनेची दखल घेतली. घटनास्थळाच्या आसपासच्या सीसीटीव्हीच्या दृश्यांमध्ये पोलिसांना एक संशयित स्कुटरस्वार दिसला. स्कुटरचा नंबरसुद्धा पोलिसांना सीसीटीव्हीमुळे समजला. आजुबाजूच्या परिसरात तपासणी केली असता आरोपीला कुर्ल्यातून अटक करण्यात आले. मोहम्मद अमीर खान असे त्या तरूणाचे नाव आहे. त्याने अनेकवेळा बायकांच्या अंगावर अनेकवेळा थुंकल्याचे मान्य केले आहे. या विकृत माणसाला असे करून आनंद मिळतो, हेही त्याने सांगितले.