कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

मुंबई: कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.वळसे-पाटील यांनी स्वत: ट्वीट करून करोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे.

मुंबई: कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil)यांना कोरोनाची (Corona Virus Infection)लागण झाली आहे. त्यांची कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.वळसे-पाटील यांनी स्वत: ट्वीट करून करोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. आज दैनंदिन कामकाजासाठी सकाळी ते मंत्रालयात उपस्थित होते. मात्र अहवाल पॉझिटिव्ह येताच ते घरी परतले आहेत.

‘नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे. ‘आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या प्रवेशाच्या सोहळ्याला वळसे-पाटील उपस्थित राहिले होते. तिथं ते अनेकांच्या संपर्कात आले होते. त्यामुळं अन्य नेत्यांनाही त्या दृष्टीनं काळजी घ्यावी लागणार आहे.